लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे: शिवणे भागात टोळक्याने दहशत माजवून मोटारीच्या काचा फोडल्याची घटना घडली. या प्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी एकास अटक केली.

अभिजीत भीमाशंकर देशमाने (वय २३, रा. देशमुखवाडी, शिवणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत करण देशमुख (वय २८ रा. शिवणे ) यांनी उत्तमनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. करण मध्यरात्री एकच्या सुमारास शिवणे भागातील देशमुखवाडी परिसरातून मोटारीतून घरी निघाले होते. त्यावेळी चार ते पाच जणांच्या टोळक्याने त्यांना अडविले. दहशत माजविण्यासाठी टोळक्याने त्यांच्या मोटारीच्या काचा फोडल्या. आरोपींनी परिसरात दहशत माजवून शिवीगाळ केली.

आणखी वाचा- पुणे : रिक्षाचालकाला दमदाटी करुन रिक्षा चोरली, भवानी पेठेतील घटना

पसार झालेल्या एकाला आरोपीला पोलिसांनी अटक केली असून साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार तपास करत आहेत.