पुणे : ऐन दिवाळीत टोळक्याने दहशत माजवून वाहनांची तोडफोड केल्याची घटना औंधमधील महापालिका वसाहतीत घडली. टाेळक्याने महिलेसह एका तरुणावर शस्त्राने वार केल्याची घटना घडली. याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी आठजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. तोडफोडीत दहा दुचाकी आणि तीन रिक्षांचे नुकसान झाले. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

याप्रकरणी ओंकार नरवडे (वय २०, रा. डाॅ. आंबेडकर वसाहत, ओैंध), पियूष (वय २१), नंदन (दोघे रा. पीएमसी वसाहत, ओैंध), आर्यन माेरे (वय २०, रा. डाॅ. आंबेडकर वसाहत, ओैंध) यांच्यासह आठजणांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत साहिल संजय पवार (वय २०, रा. डाॅ. आंबेडकर वसाहत, ओैंध) याने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pune hit and run case
पुण्यात पुन्हा हिट अँड रन! रस्त्यावर फटाके फोडणाऱ्याला भरधाव कारने दिली धडक; ३५ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
thieves stole jewellery from different parts of pune during diwali
लक्ष्मीपूजनाला सदनिकेतून दागिने लंपास- वारजे, लोणी काळभोर भागातील घटना
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
firecrackers of worth rs 30000 stolen after beating up seller in baner
बाणेरमध्ये फटाका विक्रेत्याला मारहाण करुन  लूट; ऐन दिवाळीत लूटमार; ३० हजारांचे फटाके चोरुन चोरटे पसार
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
jewellery worth two lakh stolen from woman at swargate st bus depot
दिवाळीत एसटी स्थानकात चोरट्यांचा सुळसुळाट; स्वारगेट एसटी स्थानकात महिलेकडील दोन लाखांचे दागिने लंपास

हेही वाचा >>> दिवाळीत एसटी स्थानकात चोरट्यांचा सुळसुळाट; स्वारगेट एसटी स्थानकात महिलेकडील दोन लाखांचे दागिने लंपास

आरोपींचा तक्रारदार साहिल याच्याशी किरकोळ कारणावरुन वाद झाला होता. आरोपी महापालिका वसाहतीत आले. त्यांनी साहिल आणि त्याची आई दीपाली यांना शिवीगाळ केली. दीपाली यांना मारहाण करुन त्यांच्यावर वार केले. त्यावेळी भांडणात मध्यस्थी करणाऱ्या सनी सोनवणे याच्यावर आरोपींनी वार केले.

महापालिका वसाहतीच्या आवराता लावलेल्या आठ ते दहा दुचाकींची तोडफोड केली, तसेच तीन रिक्षांच्या काचा फोडून दहशत माजविली. दहशत माजवून आरोपी पसार झाले. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत.

हेही वाचा >>> अबब! ५५ हजार…

पर्वती परिसरात तरुणावर शस्त्राने वार पर्वती भागातील लक्ष्मीनगर परिसरात शनिवारी सकाळी टोळक्याने वैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली. सूरज उर्फ बाल्या नितीन क्षीरसागर (वय २१, रा. शाहू वसाहत, लक्ष्मीनगर, पर्वती) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी शुभम गेजगे, आदित्य गेजगे, पल्या पासंगे (तिघे रा. डाॅ. आंबेडकर वसाहत, लक्ष्मीनगर, पर्वती) यांच्यासह आठजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. सूरज हा शाहू वसाहत परिसरात शनिवारी सकाळी थांबला होता. त्यावेळी आरोपींनी त्याच्यावर कोयत्याने वार केले. मध्यस्थी करणाऱ्या नागरिकांना धमकावून आरोपींनी कोयते उगारुन दहशत माजविली. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात सूरज गंभीर जखमी झाला आहे. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपींविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक शिंदे तपास करत आहेत.

Story img Loader