पिंपरी: चिंचवड शहरातील कुख्यात गुंड बाळा आप्पा वाघेरेला चिंचवड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पैशांच्या व्यवहारातून व्यवसायिकाचे अपहरण करून सात लाखांची खंडणी मागितल्याने ही कारवाई केली आहे. बाळा वाघेरे, हरीश चौधरी, राहून उणेचा आणि इतर एकाचा या गुन्ह्यात सहभाग आहे. यांपैकी तिघांना चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे.
कुख्यात गुंड आप्पा वाघेरेची घरात शिरून चिंचवड पोलिसांनी बुधवारी चौकशी केली. त्यानंतर त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. वाघेरेचा साथीदार हरीश चौधरीचा आर्थिक व्यवहार तक्रारदार व्यवसायिकाशी झाला होता. ते पैसे देखील व्यवसायिकाने परत दिले होते. तरीही तिघांनी व्यवसायिकाचे अपहरण करून बाळा वाघेरेच्या घरी नेले.
आणखी वाचा- पुणे पोलिसांचा मॉर्निंग वॉक; टेकड्या, उद्यानांच्या परिसरात गस्त आणि नागरिकांशी संवाद
व्यवसायिकाला मारहाण करत सात लाखांची खंडणी मागितली होती. पैसे आणून देतो म्हणून व्यवसायिकाने स्वतःची सुटका करून घेत थेट चिंचवड पोलीस ठाणे गाठले आणि घटनेची माहिती चिंचवड पोलिसांना दिली. चिंचवड पोलिसांनी बाळा वाघेरेच्या घरी जाऊन चौकशी करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत. बाळा वाघेरे हा कुख्यात गुंड आहे. त्याच्या विरोधात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.