पुणे : दारूसाठी पैसे मागण्याच्या वादातून अल्पवयीनांकडून गुंडाच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना मध्यरात्री हडपसर परिसरातील रामटेकडी परिसरात घडली. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी पाच अल्पवयीनांना ताब्यात घेतले.

राज शिवशरण (वय ३६, रा. रामटेकडी, हडपसर) असे खून झालेल्या गुंडाचे नाव आहे. शिवशरण याच्याविरुद्ध वानवडी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. शिवशरण आणि अल्पवयीन मुले ओळखीचे आहेत. शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास रामटेकडीतील वंदेमातरम चाैकात शिवशरण आणि अल्पवयीन मुलांमध्ये दारूसाठी पैसे मागितल्याने वाद झाला. शिवशरण आणि मुले दारू प्यायली होती. वादातून मुलांनी शिवशरणला मारहाण करण्यास सुरुवात केली. मुलांनी शिवशरणच्या डोक्यात दगड घातला, तसेच त्याच्या डोक्यात दारूची बाटली फोडली.

Bollywood film stars in grip of mafia extortion
चित्रपटसृष्टीतील कलाकार हल्लेखोर, खंडणीखोरांच्या निशाण्यावर?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Nana Patole criticizes government and law and order in state after attacked on saif ali khan in his house
सैफवरील हल्ला राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणारा; नाना पटोले यांची टीका
Nagpur murder news
गृहमंत्र्यांच्या शहरात हत्याकांडाची मालिका! चौघांनी मित्राचा खून करुन मृतदेह रस्त्यावर फेकला…
murder of youth in Bhusawal, murder Bhusawal,
भुसावळमध्ये तरुणाच्या हत्येनंतर पाच संशयितांना अटक
nitin gadkari
Nitin Gadkari : करोना, दंगली, लढायांपेक्षा अधिक मृत्यू अपघातांमुळे… खुद्द गडकरींनीच…
dead body buried
अज्ञात व्यक्तीचा खून करून मृतदेह जमिनीत पुरला, अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील घटना
Nagpur jio tower scam loksatta news
जिओ टॉवर स्कॅम : देशभरातील हजारो नागरिकांना कोट्यवधीने गंडवणारी टोळी जेरबंद, कोलकातावरून सुरू होते…

हेही वाचा – राज्यातील साडेचारशे जणांची दिव्यांग प्रमाणपत्रे बोगस? आमदार बच्चू कडू यांच्याकडून शोध अभियान

हेही वाचा – मर्सिडीज-बेंझचे प्रमुख म्हणाले, वाहतूक कोंडीमुळे कर्मचाऱ्यांचा रोज एक तास वाया जातोय

गंभीर जखमी झालेल्या शिवशरणला पोलिसांनी ससून रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. वानवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी घटनास्थळी भेट दिली. अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, दारूसाठी पैसे मागितल्याने झालेल्या वादातून शिवशरणचा खून झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक पतंगे यांनी दिली.

Story img Loader