गुंड शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांनी आज कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. शरद मोहोळच्या पत्नीने भाजपमध्ये प्रवेश केल्याने पुणे शहराच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पुणे शहर आणि ग्रामीण भागातील अनेक पोलीस स्टेशनमध्ये विविध गुन्ह्या प्रकरणी गुंड शरद मोहोळ याच्यावर गुन्हे दाखल आहेत.त्यातीलच एका गुन्ह्यात शरद मोहोळ याला अटक करण्यात आल्यानंतर त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली होती.त्यावेळी दहशतवादी कातील सिद्दीकी याचा शरद मोहोळ याने कारागृहात खून केला होता.त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.

या सर्व घडामोडी दरम्यान मागील काही महिन्यापूर्वी शरद मोहोळ यांची पत्नी स्वाती मोहोळ यांचा तत्कालीन भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश होणार हे निश्चित होते.पण काही कारणास्तव त्यावेळी पक्ष प्रवेश होऊ शकला नाही.मात्र आजअखेर गुंड शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांचा भाजपात प्रवेश झाला.त्यावेळी चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक,माजी महापौर मुरलीधर मोहोळ तसेच आजी माजी पदाधिकारी देखील उपस्थित होते.आता या पक्ष प्रवेशावरून विरोधक काय म्हणतात हे पाहणे जरुरीचे ठरणार आहे.