आभासी चलनात गुंतवणुकीच्या आमिषाने दोघांना साडेनऊ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी लष्कर पोलिसांकडून दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विक्रांत ईश्वर गर्ग, नयना देवेंद्र जॅान (दोघे रा. गाजीयाबाद, उत्तरप्रदेश) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. अब्दुल बारी नझीर खान (वय ३२, रा. इस्ट स्ट्रीट, लष्कर) यांनी याबाबत लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी नैना खान यांचा मित्र सलमानच्या ओळखीचा आहे. सलमानच्या माध्यमातून खान यांची आरोपी नयनाशी ओळख झाली होती.

आभासी चलनात गुंतवणुकीचे आमिष खान आणि त्यांचा मित्र सलमान याला दाखविण्यात आले होते. त्यानंतर दोघांनी ऑनलाइन पद्धतीने नयना आणि साथीदार ईश्वर यांच्या बँक खात्यात वेळोवेळी नऊ लाख ३९ हजार रुपये जमा केले. पैसे मिळाल्यानंतर आरोपींनी त्यांना आभासी चलन मिळवून दिले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली.

Story img Loader