पिंपरी- चिंचवड : पिंपरी- चिंचवडमध्ये पान टपरीत गांजा विक्री करणाऱ्या पान टपरी चालकाला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून पाच किलो शंभर ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. पुनीतकुमार विवेक शेट्टी असं अटक करण्यात आलेल्या गांजा विक्रेत्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नूतन वर्षाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अमली पदार्थ विक्रेत्यांवर करडी नजर ठेवली होती. नूतन वर्षाच्या पार्श्वभूमीवर अनेक जण नशा करतात हे पोलिसांना माहीत होतं. यामुळेच पुनीत कुमार हा त्याच्या साई श्री पान शॉप मधून गांजा विक्री करत असल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली होती. याबाबत पोलिसांनी सविस्तर माहिती घेऊन खात्री करून छापा टाकला आणि गांजा विक्रेता पुनीतकुमारला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून पाच किलो शंभर ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.
आणखी वाचा-मोठी बातमी! भाजप महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार
याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात बेकायदेशीररित्या गांजा बाळगल्या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस ऍक्ट कलम ८(क), २०(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.