गणेशोत्सवाची तयारी जोरदार सुरू असून गणेश चतुर्थीच्या दिवशी बुधवारी (३१ ऑगस्ट) ब्राह्ममुहूर्तापासून म्हणजे पहाटे ४ वाजून ४८ मिनिटे ते दुपारी १ वाजून ५४ मिनिटांपर्यंत घरोघरी आपल्या सोयीनुसार गणरायाची प्रतिष्ठापना करता येईल. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांना मध्यान्हानंतर गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करता येऊ शकेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भाद्रपद शुद्ध चतुर्थीला पहाटेच्या ब्राह्ममुहूर्तापासून ते दुपारी १ वाजून ५४ मिनिटांपर्यंत प्रत्येकाला आपल्या आणि गुरुजींच्या सोयीने घरातील पार्थिव गणेशाची स्थापना आणि पूजन करता येईल. त्याकरिता भद्रादि (विष्टि) कोणतेही कुयोग वर्ज्य करण्याची किंवा विशिष्ट मुहूर्त वेळेची आवश्यकता नाही, असे ‘दाते पंचागकर्ते’चे मोहन दाते यांनी सांगितले. 

हेही वाचा : पुणे : संयुक्त मुख्य परीक्षा २०२२ आणि आरोग्य भरती परीक्षा एकाच दिवशी ; दोन्ही परीक्षांचे अर्ज भरलेले उमेदवार अडचणीत, तारखा बदलण्याची मागणी

गणरायाच्या प्रतिष्ठापनेनंतर गृहिणींना गौरी आगमनाचे वेध लागतात. शनिवारी (३ सप्टेंबर) अनुराधा नक्षत्र दिवसभर असल्याने  दिवसभरात आपल्या सवडीनुसार केव्हाही गौरी आवाहन करता येईल. ज्येष्ठा नक्षत्र माध्यान्ही असलेल्या दिवशी पूजन करावे असे असल्याने रोजी रविवारी (४ सप्टेंबर) नेहमीप्रमाणे गौरी पूजन करावे.

हेही वाचा : पुणे : दारुमुक्त, प्लास्टिकमुक्त गणेशोत्सवाचा निर्धार ; मानाच्या गणपती मंडळांकडून मोरया कार्यकर्ता मंचाची स्थापना

सोमवारी (५ सप्टेंबर) मूळ नक्षत्रावर रात्री ८ वाजून ६ मिनिटांपर्यंत केव्हाही गौरी आणि गणपतीचे विसर्जन करता येईल.
यावर्षी अनंत चतुर्दशी शुक्रवारी (९ सप्टेंबर) आहे. दहा दिवसांच्या गणपतींचे आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशाचे विसर्जन या दिवशी दिवसभरात केव्हाही करता येईल. पुढील वर्षी १९ सप्टेंबर रोजी गणरायाचे आगमन होणार आहे, असे दाते यांनी सांगितले.