रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांच्या खालीच महापालिका अधिकारी आणि कर्मचारी कचरा पेटवून देत आहेत. त्यामुळे या झाडांची मोठय़ा प्रमाणात हानी होत असून नागरिकांनाही होणाऱ्या धुरामुळे श्वासोच्छवासाचा त्रास होत आहे.
शहरातला कचरा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. त्यात महापालिका अधिकारी आणि कर्मचारीच रस्त्याच्या कडेला कचरा पेटवून देत आहेत. यामुळे रस्त्याच्याकडेला असलेली झाडे जळू लागली आहेत. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कोथरूड विधानसभा मतदार संघाच्या उपाध्यक्षा बेबी निम्हण यांनी औंध क्षेत्रीय कार्यालयात निवेदन दिले आहे. मात्र, अद्याप त्यावर महापालिकेकडून काहीही कारवाई झालेली नसून, अजूनही कचरा पेटवला जात आहे.
पालिकेनेशहरात सध्या बाणेर लिंक रोड, सोमेश्वर वाडी, पाषाण गाव, गोराकुंभार शाळा पाषाण, अभिनव महाविद्यालय, सुसरोड या ठिकाणी हे चित्र सर्रास दिसून येत आहे. महापालिका अधिकारी आणि कर्मचारीच हा कचरा दर आठ दिवसाला जाळत आहेत. त्यामुळे हिरवेगार पुणे धोक्यात आले आहे, अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून येत आहे. तक्रार देऊनही हा प्रकार थांबलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत., कचरा स्वत: जिरवावा अशा सूचना नागरिकांना दिल्या आहेत. मात्र, नागरिक कचरा रस्त्याच्या कडेला टाकतात. त्यामुळे चार-पाच दिवसात या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात कचऱ्याचा ढीग होतो. हा कचरा उचलून घेऊन न जाता, त्याच ठिकाणी पालिकेकडून पेटवून देण्यात येत आहे. यामुळे रस्त्याच्या कडेला असलेली ‘हिरवीगार’ झाडे जळू लागली असून, धुरामुळे प्रदूषणात मोठी वाढ होत आहे. त्याचबरोबर नागरिकांनाही या धुराचा मोठय़ा प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा