पुणे : गरवारे महाविद्यालय स्थानक ते रूबी हाॅल क्लिनिक स्थानक या दरम्यानच्या मेट्रो मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आले असून मार्गिकेची कामे मार्च अखेरपर्यंत पूर्ण होणार आहेत. त्यानंतर केंद्रीय समितीच्या पाहणी दौऱ्या नंतर या मार्गावर प्रवासी सेवा सुरू होणार आहे. या मार्गिकेअंतर्गत डेक्कन आणि छत्रपती संभाजी महाराज उद्यान स्थानकाचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. गरवारे महाविद्यालय स्थानक ते रूबी हॉल क्लिनीक स्थानक या दरम्यान डेक्कन, छत्रपती संभाजी महाराज उद्यान, पुणे महापालिका, शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालय, आरटीओ, पुणे रेल्वे स्थानक ही स्थानके आहेत.
हेही वाचा >>> दौंडजवळ रेल्वेगाडीखाली उडी मारुन नवविवाहित तरुणाची आत्महत्या
मार्गिकेवर प्रवासी सेवा सुरू झाल्यानंतर नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्ता (एफएस रस्ता), जंगली महाराज रस्ता, बालगंधर्व रंगमंदिर, पुणे महापालिका, आरटीओ, वाडिया महाविद्यालय आदी महत्त्वाची ठिकाणे मेट्रोद्वारे जोडली जाणार आहेत. डेक्कन आणि छत्रपती संभाजी महाराज उद्या या स्थानकांची वैशिष्ट्यपूर्ण रचना आहे. या दोन्ही स्थानकांची रचना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्याच्या पगडीच्या आकाराप्रमाणे करण्यात आली आहे.
हेही वाचा >>> कोरेगाव पार्क भागात मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; चार परदेशी महिलांसह सातजणी ताब्यात
सुमारे १४० मीटर लांब, २६ मीटर उंच आणि २८ मीटर रुंद अशा भव्य स्थानकांची रचना मावळा पगडी प्रमाणे करणे हे आव्हानात्मक काम होते. स्थानकांच्या छताची रचना त्रिमितीय असल्यामुळे प्ररत्येक लोखंडी खांब, रुफ शीटची लांबी, उंची आणि रुंदी भिन्न आहे. ही दोन्ही स्थानके नदीपात्रात असून स्थानकांची उंची जमिनिपसुन ६० ते ७० फूट एवढी आहे. ही स्थानके प्रवाशांसाठी एप्रिल महिन्यापर्यंत खुली होणार असल्याने जंगली महाराज रस्ता, बालगंधर्व रंगमंदिर, माॅडर्न महाविद्यालय, फर्ग्युसन महाविद्यालय, डेक्कन जिमखाना, नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्ता आदी ठिकाणे मेट्रोने जोडणे शक्य होणार आहे. या स्थानकांवर जाण्यासाठी पादचारी पुलाचे काम सुरू झाले आहे. नारायण पेठ ते डेक्कन स्थानक आणि छत्रपती संभाजी महाराज स्थानक ते शनिवार पेठ ही दोन्ही ठिकाणे पादचारी पुलाद्वारे जोडली जाणार आहेत.