सांगवीमध्ये असेलेल्या एका बिर्याणी हाऊसमध्ये गॅस गळती होऊन झालेल्या स्फोटात दोन जण बचावले आहेत. वेळीच हॉटेल मालक आणि कारागीर बाहेर पडल्यामुळे त्यांचा जीव बचावला. बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास दुर्घटना घडली आहे. सलमान अमजद खान यांच्या मालकीचे हे बिर्याणी हाऊस आहे.

सलमान अमजद खान यांना बिर्याणीची मोठी ऑर्डर मिळाली होती. त्यामुळे सकाळी लवकर त्यांनी कामाला सुरूवात केली होती. हॉटेल मालक सलमान अमजद खान आणि कारागीर बिर्याणी बनवत असताना अचानक गॅस गळती झाल्याचे समजले. आग लागणार हे समजताच सलमान खान आणि कारागीर बिर्याणी हाऊसच्या बाहेर पडले. काही क्षणातच हॉटेलला भीषण आग लागली यात हॉटेलचे मोठे नुकसान झाले. मात्र, प्रसंगावधानामुळे दोघांचेही जीव वाचले.

Story img Loader