लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : मुंबई-बंगळुरू बाह्यवळणमार्गावरील वारजे पुलाजवळ गॅस वाहतूक करणारा टँकर उलटल्याची घटना रविवारी सकाळी घडली. टँकर उलटल्यानंतर बाह्यवळण मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. अखेर सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास उलटलेला ठँकर क्रेनच्या सहायाने बाजूला काढण्यात आला. त्यानंतर बाह्यवळण मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.
इण्डेन कंपनीचा गॅस टँकर मुंबईहून साताऱ्याकडे रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास निघाला होता. निघालेला होता. वारजे पुलाजवळील टाटा मोटर्स शोरूमसमोर टँकर उलटला.सुदैवाने समोरुन वाहन येत नव्हते. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. टँकरचालकासह मदतनीस सुखरुप बाहेर पडले. मात्र, या घटनेनंतर दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. टँकर आकाराने मोठा असल्याने वाहतूक विस्कळीत झाली. वाहनांच्या रांगा लागल्याने या भागात कोंडी झाली. या घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस, अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, टँकरमध्ये गॅस असल्याने बाजूला काढण्यासाठी अडचण आली. सुरक्षेच्या उपाययोजना करून वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली.
आणखी वाचा-जुन्नरमध्ये मतविभागणीमुळे सोनावणेंचा विजय सुकर
वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला. बाह्यवळण मार्गावर चार ते पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. टँकर बाजूला काढण्यासाठी पाच क्रेन मागविण्यात आल्या. अखेर सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास टँकर बाजूला काढण्यात आला. त्यानंतर बाह्यवळण मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. टँकर सुरक्षितस्थळी हलविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. टँकर नेमका कसा उलटला, याबाबतची माहिती मिळू शकली नाही. टँकर चालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकर उलटल्याची शक्यता वारजे पोलिसांनी व्यक्त केली.