पुणे : पुण्यातील येरवडा पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या चौकात काल सकाळी बीएमडब्लू गाडी रस्त्यात थांबवून मद्यधुंद तरुणाने लघुशंका केल्याची घटना घडली.त्यावेळी स्थानिकांनी हटकल्यानंतर त्या तरुणाने अश्लील हावभाव करून भरधाव कारने निघून गेला.या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणी संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तर या प्रकरणातील मुख्य आरोपी गौरव मनोज अहुजा हा गाडी चालवत होता आणि त्याच्या बाजूला भाग्येश निबजीया ओसवाल शेजारी बसलेला होता.या दोघांविरोधात येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.या दोन्ही आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी पथक रवाना केली होती.त्यातील आरोपी भाग्येश निबजीया ओसवाल याला कालच सायंकाळच्या सुमारास अटक केली होती.तर मुख्य आरोपी गौरव आहुजा चा शोध पुणे पोलीस घेत होते.त्याच दरम्यान गौरव आहुजा याने त्याच्याकडून झालेल्या कृत्याबाबत माफी मागत असलेला व्हिडिओ समोर आला.त्यानंतर गौरव आहुजा याला पुणे पोलिसांनी सातारा येथून ताब्यात घेतले असून त्याची वैद्यकीय तपासणी केली आहे.आता पुणे जिल्हा सत्र न्यायालयात पोलिस किती वाजता हजर करतात आणि काय युक्तीवाद होतो,याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

मला माफ करा, पुढील आठ तासात पोलिसांसमोर हजर होणार असे गौरव आहुजा व्हिडिओ मध्ये बोलताना दिसतोय मुख्य आरोपी गौरव मनोज अहुजा चा माफी मागताना चा व्हिडिओ लोकसत्ता डॉट कॉम च्या हाती आला आहे.त्यामध्ये मुख्य आरोपी गौरव आहुजा हा हात जोडून म्हणतोय, नमस्कार मी गौरव आहुजा राहणार पुणे, माझ्याकडून पब्लिकमध्ये जे कृत्य घडले,ते कृत्य खूप चुकीचे होते.त्यामुळे मी मनापासून माफी मागतो,संपूर्ण जनता,पोलीस विभाग आणि शिंदे साहेब,या सर्वांची मी मनापासून माफी मागतो.मला माफ करा आणि मला एक संधी द्या,तसेच मी पुढच्या आठ तासात येरवडा पोलिसांसमोर हजर होणार आहे.माझ्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यांना त्रास देऊ नका,अशी विनंती करताना आरोपी दिसत आहे.आता त्यावर येरवडा पोलीस कशा प्रकारे पुढील कार्यवाही करतात हे पाहणे जरुरीचे ठरणार आहे.