पिंपरीत महिला दिनानिमित्त आयोजीत कार्यक्रमात गौतमी ने लावली होती हजेरी
पिंपरी- चिंचवडमध्ये प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या नृत्यावर महिला थिरकल्याच पाहायला मिळालं. गौतमी ही खासगी कार्यक्रमासाठी आलेली होती. तेव्हा, गौतमी ने पाटलांचा बैलगाडा आणि कच, कच, कापताना कांदा.. या दोन गाण्यांवर गौतमी ने नृत्य करत उपस्थित महिलांची मने जिंकली गौतमी च नृत्य पाहून महिला स्वतः रोखू शकल्या नाहीत आणि त्यांनी देखील त्या गाण्यांवर ठेका धरला. महिला दिनानिमित्त गौतमीच्या कार्यक्रमाच आयोजन करण्यात आलं होतं.
प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील चा कार्यक्रम म्हटला की थांबायला देखील जागा नसते. तिच्या कार्यक्रमात हमखास गोंधळ होतो असे आपण बहुतांश वेळा पाहिलेले आहे. पिंपरी- चिंचवड शहरात गौतमी पाटील ने महिला दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या खासगी कार्यक्रमात हजेरी लावली. महिलांच्या आग्रहवास्तव तिने दोन गाण्यावर महिलांसमोरच नृत्य केले. गौतमी ने महिलांची मने जिंकली. गौतमी चे नृत्य पाहून प्रेक्षकामधील महिलांनी देखील एकच ठेका धरला. नेहमी पुरुष, गौतमी पाटील च्या कार्यक्रमाला हजेरी लावतात. परंतु, आज केवळ महिलांची उपस्थिती असलेल्या कार्यक्रमात गौतमी पाटील ने नृत्य केले. यावेळी पत्रकारांशी बोलताना गौतमी पाटील म्हणाले की,महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली याचा आनंद आहे. मला जे चांगलं म्हणतात त्यांना धन्यवाद आणि ज्यांना वाटत माही मी चांगलं करते त्यांना बाय बाय!, अस म्हणत तिने तिला नेहमी तिला नावं ठेवणाऱ्यांना टोला लगावला आहे. पुढे ते म्हणाले की, माझ्या कार्यक्रमाला पुरुषांची गर्दी असते त्यांच्या समोर नृत्य करते आज महिलांसमोर नृत्य करत असताना आनंद वाटला.