महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव असणाऱ्या गीतरामायणाला ६० वर्षे पूर्ण होत असून, त्यानिमित्त गरवारे महाविद्यालयाच्या पटांगणावर २६ ते २८ मार्च दरम्यान सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत गीतरामायण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध संगीतकार श्रीधर फडके यांच्या हस्ते होणार आहे. ‘पृथ्वी एडिफीस’ हे या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत.
हा कार्यक्रम उद्घाटनाच्या दिवशी मराठीत होणार आहे. त्यानंतर पुढील दोन दिवसांत तो संस्कृत, हिंदी, गुजराती व जर्मन भाषांमध्ये देखील होणार आहे. आकाशवाणीचा सत्कार, गौरव अंकाचे प्रकाशन, गदिमांचे भाषण, बाबूजींनी (सुधीर फडके) गायलेले गीतरामायण व अन्य कार्यक्रमांच्या एकत्रित डीव्हीडीचे प्रकाशन असे कार्यक्रम या महोत्सवात होणार आहेत. या महोत्सवाची सांगता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह भय्याजी जोशी यांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमासाठी ६०० व ३०० रुपये असे तिकिट ठेवण्यात आले आहे. तिकिट विक्री बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाटय़गृह, टिळक स्मारक रंगमंदिर, अण्णा भाऊ साठे नाटय़गृह आणि ग्राहक पेठ टिळक रोड व बिबवेवाडी येथे सुरु आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा