पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटप्रकरणी विशेष न्यायालयाने मिर्झा हिमायत बेग याला सोमवारी दोषी ठरविले. हिमायत बेग हा या गुन्ह्यातील एकमेव अटक झालेला आरोपी होता. विशेष न्यायाधीश एन. पी. धोटे यांच्या न्यायालयाने त्याला दोषी ठरविले. येत्या गुरुवारी त्याला शिक्षा ठोठावण्यात येणार आहे.
बेगविरुद्ध हत्या करणे, हत्येचा प्रयत्न, गुन्हेगारी कट रचणे, अवैधरित्या स्फोटके जवळ बाळगणे हे आरोप न्यायालयात सिद्ध झाले आहेत. शिक्षा सुनावण्याआधी बेगला त्याची बाजू मांडण्याची संधी देण्यात येणार आहे. मुळचा बीडचा रहिवासी असलेल्या बेगला २०१०मध्ये पुण्यातील पेरूगेट चौकाजवळ अटक करण्यात आली होती. न्यायालयाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात जाणार असल्याचे बेगचे वकील ए. रेहमान यांनी पत्रकारांना सांगितले.
कोरेगाव पार्कमधील जर्मन बेकरीत १३ फेब्रुवारी २०१० रोजी सायंकाळी बॉम्बस्फोट झाला होता. यामध्ये परदेशी नागरिकांबरोबर देशातील १७ जणांचा मृत्यू झाला. तर ५७ जण जखमी झाले होते. या खटल्यात विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. न्यायालयात १०९ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. या गुन्ह्याचा तपास दहशतवादविरोधी पथकाचे तत्कालिन सहायक पोलीस आयुक्त विनोद सातव यांनी केला होता.
जर्मन बेकरी बॉम्बस्फोटप्रकरणी मिर्झा हिमायत बेग दोषी
पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटप्रकरणी विशेष न्यायालयाने मिर्झा हिमायत बेग याला दोषी ठरविले. हिमायत बेग हा या गुन्ह्यातील एकमेवर अटक झालेला आरोपी होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 15-04-2013 at 11:49 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: German bakery blast mirza himayat baig declared guilty