पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी मिर्झा हिमायत बेग याला गुरुवारी विशेष न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावली. गेल्या सोमवारी न्यायालयाने बेगला दोषी ठरविले होते. हिमायत बेग हा या गुन्ह्यातील एकमेव अटक झालेला आरोपी होता. विशेष न्यायाधीश एन. पी. धोटे यांच्या न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली. 
बेगविरुद्ध हत्या करणे, हत्येचा प्रयत्न, गुन्हेगारी कट रचणे, अवैधरित्या स्फोटके जवळ बाळगणे हे आरोप न्यायालयात सिद्ध झाले आहेत. गुरुवारी शिक्षा सुनावण्याआधी बेगला त्याची बाजू मांडण्याची संधी देण्यात आली. मुळचा बीडचा रहिवासी असलेल्या बेगला २०१०मध्ये पुण्यातील पेरूगेट चौकाजवळ अटक करण्यात आली होती.
कोरेगाव पार्कमधील जर्मन बेकरीत १३ फेब्रुवारी २०१० रोजी सायंकाळी बॉम्बस्फोट झाला होता. यामध्ये परदेशी नागरिकांबरोबर देशातील १७ जणांचा मृत्यू झाला. तर ५७ जण जखमी झाले होते. या खटल्यात विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. न्यायालयात १०९ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. या गुन्ह्याचा तपास दहशतवादविरोधी पथकाचे तत्कालिन सहायक पोलीस आयुक्त विनोद सातव यांनी केला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा