German Bakery १३ फेब्रुवारी २०१० हा दिवस पुणेकरांसाठी काळा दिवस ठरला असंच म्हणता येईल. याचं कारणही तसंच होतं. पुण्यातील सुप्रसिद्ध जर्मन बेकरीमध्ये स्फोट झाला होता. कोरेगाव पार्क या पुण्यातील आलिशान भागात जर्मन बेकरी आहे. या बेकरीच्या मालकीण असलेल्या स्मिता खरोसे यांनी या घटनेच्या नकोशा आठवणी सांगितल्या आहेत. स्मिता या त्यांच्या १९ वर्षांच्या मुलीसह जर्मन बेकरी या ठिकाणी संध्याकाळी ५.३० पर्यंत होत्या. त्या दोघीही घरी आल्या आणि स्मिता यांची मुलगी स्नेहल घरी टीव्हीसमोर बसली तितक्यात फोन आला. तो फोन जर्मन बेकरीच्या मॅनेजरचा होता. मॅडम स्फोट झालाय जर्मन बेकरीत ही त्याची वाक्यं होती.

स्मिता खरोसे आणि स्नेहल यांनी काय सांगितलं?

स्मिता खरोसे सांगतात, त्याने सांगितलं माझा विश्वासच बसला नाही. मी त्याला म्हणाले मला वेड्यात काढतो आहेस का? स्फोट झाला हे सांगणं ही जोक करण्याची गोष्ट आहे का? त्यावर तो म्हणाला मॅडम मी मुळीच खोटं बोलत नाही. तुम्ही टीव्हीवर न्यूज चॅनल लावा. सगळा गदारोळ झाला आहे. मी जेव्हा टीव्ही लावला तेव्हा जर्मन बेकरीत सिलिंडर स्फोट झाल्याची बातमी सुरु होती. मात्र स्नेहलने सांगितलं की तो सिलिंडरचा स्फोट नव्हता. आम्ही स्फोट झाल्याची बातमी समजताच तातडीने बेकरीकडे निघालो, त्यावेळी आम्हाला कळलं की तो एक दहशतवादी हल्ला होता. दहशवादी हल्ला आपल्या पुण्यात? तोदेखील जर्मन बेकरीवर? असं काय घडलंय? असंख्य प्रश्नांचं काहूर आमच्या मनात साठलं होतं. स्नेहलने इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं.

जर्मन बेकरी स्फोटात १७ जणांचा मृत्यू

जर्मन बेकरी या ठिकाणी झालेल्या स्फोटात १७ लोक ठार झाले तर ५८ लोक जखमी झाले. या घटनेला १५ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र स्नेहल आणि तिच्या आईला हा प्रसंग अजूनही तो प्रसंग जसाच्या तसा आठवतो आहे. स्नेहलने सांगितलं की ती आणि तिचा भाऊ दोन जर्मन बेकरीमध्ये स्फोट झाला तेव्हा दोन किमी अलिकडे उतरले. कारण रस्ते बंद करण्यात आले होते. जर्मन बेकरी या ठिकाणी लोक मोठ्या प्रमाणावर यायचे. एक शांत जागा म्हणून जर्मन बेकरी प्रसिद्ध होती. अनेकांचं ते आवडतं ठिकाण होतं अशा ठिकाणी स्फोट झाल्याने आम्ही पार हादरुन गेलो होतो. लोकांच्या आवडत्या जर्मन बेकरीत रक्ताचे सडे पडले होते. तसंच अनेक भिंती डागाळून गेल्या. काळाच्या पडद्याआड गेलेल्या त्या आठवणी आजही तशाच्या तशाच आहेत.

स्नेहल खरोसे म्हणाल्या मी त्या घटनेनंतर दोन ते तीन महिने झोपू शकले नाही

स्नेहलने सांगितलं जे काही मी तिथे पाहिलं त्यानंतर दोन ते तीन महिने मी झोपू शकले नाही. ती घटना, तिथे पाहिलेलं दृश्य सगळं माझ्या डोक्यात घोळत होतं. रुग्णवाहिकांच्या सायरनचे आवाज, लोकांचे आवाज, तिथे कुणी जाऊ नका म्हणत लोकांचं ओरडणं असं सगळं माझ्या डोक्यात घोळतं आहे. मी पोलीस स्टेशनला गेले होते. तिथे माझा जबाब पोलिसांनी नोंदवून घेतला. तसंच त्यानंतर मला रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे रुग्णांची ओळख पोलिसांनी पटवली.

ज्ञानेश्वर खरोसेंनी सुरु केली होती बेकरी

स्नेहलने इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं की माझे वडील ज्ञानेश्नर खरोसे यांनी जर्मन बेकरी ही १९८८ मध्ये Woody Klaus या जर्मन कंपनीच्या मदतीने सुरु केली होती. जर्मन बेकरीतलं वातावरण हे एखाद्या घरात आपण आहोत असंच होतं. ज्ञानेश्वर खरोसे यांना हॉटेलिंग किंवा बेकरी व्यवसायातला काही अनुभव नव्हता. तरीही ते या व्यवसायात उतरले. या सगळ्या घटना मला तेव्हा आठवून गेल्या.

जर्मन बेकरी पुन्हा सुरु करण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी गेला. त्या कालावधीत मी आर्थिक अडणींतून गेले. आमच्या उदरनिर्वाहासाठीचा स्रोत आमची जर्मन बेकरी होती. मात्र स्फोट झाल्याने ती तीन वर्षे बंद होती. आम्ही सगळ्या आव्हानांचा सामना करुन ही बेकरी सुरु केली असंही स्नेहल यांनी सांगितलं.

Story img Loader