निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर झालेल्या पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांनंतर रिकाम्या झालेल्या जागेवर शनिवारी नियुक्त्या केल्या. गेल्या दहा महिन्यांपासून रिक्त असलेल्या िहजवडी पोलीस ठाण्याला अखेर वरिष्ठ निरीक्षक मिळाला आहे. शहरात ४२ पोलीस निरीक्षकांच्या विविध ठिकाणी नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
हिंजवडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकपदी नवी मुंबईहून बदलून आलेले पोलीस निरीक्षक एस. पी. भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर या ठिकाणी पोलीस निरीक्षक गुन्हे म्हणून काम करणारे पी.डी पाटील यांची विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे. बाहेरून पुण्यात बदली झालेल्या वीस पोलीस निरीक्षकांना पोलीस ठाणे देण्यात आली आहेत. सध्या पोलीस ठाण्याच्या दुसऱ्या क्रमांच्या पोलीस निरीक्षकाचा कारभार सांभाळणाऱ्या चार जणांस त्याच ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नेमण्यात आले आहे. त्याच बरोबर काही वाहतूक शाखेतील पोलीस निरीक्षकांची बदली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Story img Loader