‘गिरिप्रेमी’ या गिर्यारोहकांच्या संस्थेचे अनुभवी गिर्यारोहक उमेश झिरपे यांच्यासह लहान-मोठय़ा वयाच्या १२ गिर्यारोहकांचा चमू प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर मंगळवारी संध्याकाळी पुण्यात पोहोचला. गुरुवारी सकाळी ‘गिरिप्रेमी’चे ८ ते ९ एव्हरेस्टवीर पुन्हा काठमांडूला बचाव कार्यासाठी जाणार आहेत.       
विमानतळावर विमानात बसण्यासाठी आपला नंबर येत नाही, परतीच्या प्रवासाबद्दलचे नियोजन कळत नाही अशा परिस्थितीत नेपाळमध्ये अडकलेले भारतीय प्रवासी दिशाहीन झाले असल्याचे झिरपे यांनी सांगितले. परतीच्या प्रवासाचा अनुभव सांगताना ते म्हणाले, ‘प्रवासी आणि गिर्यारोहकांबरोबरच नेपाळमध्ये काम करणारे, स्थायिक झालेले भारतीय देखील नेपाळमधून बाहेर पडण्याच्या मन:स्थितीत असल्यामुळे नागरिकांचे लोंढेच्या लोंढे परतीच्या वाटेवर आहेत. मिळेल त्या वाहनाने लोक परत येत असल्याने वाहतूक कोंडी आहे. विमानतळावर तीन उभारल्यानंतर आम्ही सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता बसने येण्यास निघालो. काठमांडूतून गोरखपूर सीमेवर येण्यास एरवी ८ ते ९ तास लागतात, पण आम्ही २८ तारखेच्या पहाटे ४ वाजता गोरखपूरला पोहोचलो. मंगळवारी दुपारी दीड वाजता बसनेच लखनौला पोहोचलो आणि तिथून पुण्याला विमानाने आलो. वीज, पाणी, इतर आवश्यक गोष्टींचा नेपाळमध्ये तुटवडाच आहे, पण भारताकडून मोठय़ा प्रमाणावर मदत जाताना दिसली.’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा