पुणेकरांच्या पाणीवापराबाबत चुकीची विधाने करणाऱ्या आमदार गिरीश बापट यांनी पुणेकरांचा अपमान केला असून त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी महापालिकेतील विरोधी पक्षनेता आणि काँग्रेसचे गटनेता अरविंद शिंदे यांनी गुरुवारी केली.
पुणेकरांची अंघोळ तसेच गाडय़ा धुणे याबाबत आमदार बापट यांनी केलेली विधाने वस्तुस्थितीला धरून नाहीत. पुणेकर पाण्याचा अपव्यय करत नाहीत. त्यामुळे पुण्यातील एखाद्या लोकप्रतिनिधीने अशी विधाने करणे पुण्याच्या हिताचे नाही. मुळातच, पुण्यात पन्नास टक्के पाणीकपात सुरू आहे आणि पुणेकरांनी ती स्वीकारली आहे. ही वस्तुस्थिती लक्षात न घेता आमदार बापट यांनी जी विधाने केली आहेत, ती पाहता त्यांना योग्य ती माहिती नसावी असे दिसते. कोणीही उठावे आणि पुणेकरांना बोलावे असा हा प्रकार असून त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, असा दावा शिंदे यांनी केला.
आमदार बापट यांनी राजीनामा द्यावा – काँग्रेस
पुणेकरांच्या पाणीवापराबाबत चुकीची विधाने करणाऱ्या आमदार गिरीश बापट यांनी पुणेकरांचा अपमान केला असून त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. अशी मागणी महापालिकेतील विरोधी पक्षनेता आणि काँग्रेसचे गटनेता अरविंद शिंदे यांनी गुरुवारी केली.
First published on: 03-05-2013 at 02:28 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girish bapat should resign arvind shinde