पुणेकरांच्या पाणीवापराबाबत चुकीची विधाने करणाऱ्या आमदार गिरीश बापट यांनी पुणेकरांचा अपमान केला असून त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी महापालिकेतील विरोधी पक्षनेता आणि काँग्रेसचे गटनेता अरविंद शिंदे यांनी गुरुवारी केली.
पुणेकरांची अंघोळ तसेच गाडय़ा धुणे याबाबत आमदार बापट यांनी केलेली विधाने वस्तुस्थितीला धरून नाहीत. पुणेकर पाण्याचा अपव्यय करत नाहीत. त्यामुळे पुण्यातील एखाद्या लोकप्रतिनिधीने अशी विधाने करणे पुण्याच्या हिताचे नाही. मुळातच, पुण्यात पन्नास टक्के पाणीकपात सुरू आहे आणि पुणेकरांनी ती स्वीकारली आहे. ही वस्तुस्थिती लक्षात न घेता आमदार बापट यांनी जी विधाने केली आहेत, ती पाहता त्यांना योग्य ती माहिती नसावी असे दिसते. कोणीही उठावे आणि पुणेकरांना बोलावे असा हा प्रकार असून त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, असा दावा शिंदे यांनी केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा