चित्ररसिकांना तैलरंग, जलरंग, अ‍ॅक्रेलिक व इंक या माध्यमातील विविध चित्रे पाहण्याची संधी प्रदर्शनाद्वारे मिळणार आहे. चित्रकार शिरीश देशमुख यांनी चितारलेली निसर्गचित्रे, पौराणिक चित्रे, ग्रामीण जीवनाची माहिती देणारी ‘ग्रामकन्या’, गणेशोत्सव अशा विविध विषयांवरील चित्रे या प्रदर्शनात आहेत. चित्रकार देशमुख यांचे हे १२ वे प्रदर्शन आहे. गेल्या ३५ वर्षांपासून ते या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी अभिनव कला महाविद्यालयातून शिक्षण घेतले आहे.
आजपर्यंत अनेक राष्ट्रीय व युरोप, अमेरिका, जपान आदी ठिकाणच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांत त्यांनी भाग घेतला आहे. आज या प्रदर्शनाचा शेवटचा दिवस असून सेनापती बापट रस्त्यावरील कलाछाया कँपस येथे सकाळी ११ ते ५ या वेळात ते रसिकांसाठी खुले राहणार आहे.

Story img Loader