पाटबंधारे खात्यात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. सरकारने आवश्यक तिथे चौकशी केली आहे. प्रत्येक ठिकाणी चौकशी आणि निलंबन करत राहिलो तर हे निलंबन खाते होईल, अशी टिप्पणी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केली.
खडकवासला प्रकल्पाच्या जुना मुठा कालव्याचे नूतनीकरण हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी येथे महाजन यांच्या उपस्थितीत झाले. त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. पाटबंधारे (जलसंपदा) विभाग बदनाम झाला आहे. त्यामुळेच मागचे सरकार गेले. हा विभाग मूठभर ठेकेदारांच्या हातात गेला होता. त्यामुळेच आताच्या सरकारने आधीची ७००-८०० कोटी रुपयांची कामे रद्द केली आहेत. आता या विभागात पारदर्शक कारभार आला आहे, असे महाजन यांनी सांगितले.
..तर हे निलंबन खाते बनेल!
पाटबंधारे खात्यात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. सरकारने आवश्यक तिथे चौकशी केली आहे. प्रत्येक ठिकाणी चौकशी आणि निलंबन करत राहिलो तर हे निलंबन खाते होईल.
First published on: 27-02-2015 at 04:27 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girish mahajan contractor irrigation