पुणे : प्रियकराच्या त्रासामुळे एका १९ वर्षीय युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी प्रियकरासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या प्रकरणी प्रियकर प्रवीण पिडालथा (रा. आंध्रप्रदेश) आणि त्याची चुलतबहीण नॅन्सी पिडालथा (रा. घोरपडी) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत युवतीच्या आईने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. युवतीने घोरपडी परिसरातील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुरुवातीला या प्रकरणी वानवडी पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली होती. युवतीच्या आईने न्यायालयात खासगी तक्रार दाखल केली होती. न्यायालयाच्या आदेशाने प्रियकर प्रवीण आणि चुलतबहिण नॅन्सी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा – पुण्यात रामदास आठवले यांनी काढली कार्यकर्त्यांची अक्कल; म्हणाले, “यांना चांगलं ट्रेनिंग द्या…”

आरोपी प्रवीण आणि आत्महत्या केलेल्या १९ वर्षीय युवतीचे प्रेमसंबंध होते. प्रवीण आणि नॅन्सी तिच्याकडे पैशांची मागणी केली होती. युवतीने खर्चासाठी पैसे हवेत, असे सांगून आईकडून पैसे घेतले होते. तिने आईकडून घेतलेले पैसे दोघांना दिले होते. त्यानंतर आरोपींकडून युवतीला पैशांसाठी धमकावण्यात येत होते. समाजमाध्यमावर युवतीची छायाचित्रे आणि ध्वनिचित्रफीत प्रसारित करण्याची धमकी देण्यात आली. आरोपींच्या त्रासामुळे युवतीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस उपनिरीक्षक खरबडे तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girl commits suicide due to boyfriend troubles pune print news rbk 25 ssb