टिकटॉकची सध्या तरुणाईला चांगलीच भुरळ पडली आहे. टिक टॉकवर व्हिडीओसाठी कोण काय करेल याचा काही नेम नाही. असाच प्रत्येय पुण्यात आला आहे. टिकटॉकवर व्हिडिओ बनविन्यासाठी एक तरुणीने पीएमटीची चालू बस थांबवून, त्यासमोर डान्स केला आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहे.

पुण्यातील हडपसर गाडीतळ येथील बस स्टँडवर हा प्रकार घडला आहे. मंगळवारी रात्री तरूणीने पीएमटी बस थांबवून ‘चलो, इश्क लड़ाएं’ या गाण्यावर ठेका धरला आहे. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.


व्हिडीओतील तरूणी कोण आहे अद्यप समजू शकले नाही. अचानक बससमोर तरूणी डान्स करायला लाहल्याने बस चालकालाही सुरूवातील काही समजले नाही. यावेळी बसमध्ये प्रवासीही होते.

Story img Loader