लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: घराबाहेर खिडकीला दोरी आणि टॉवेल बांधून झोका घेत असताना गळफास बसून सात वर्षांच्या बालिकेचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना कात्रज भागातील आंबेगाव परिसरात घडली. या घटनेनंतर या परिसरात शोककळा पसरली.

मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Request to the court to quash the rape charges against the boy by the girl in Nagpur news
मुलगी न्यायालयात म्हणाली, चुकीने बलात्काराची तक्रार…आता मला भूतकाळ…
vishal gawali who assaulted girl in Chakki Naka area of ​​Kalyan handed over to Kolsewadi police
कल्याणमधील बालिकेचा मारेकरी विशाल गवळी डोंबिवलीतील पोलीस कोठडीत
Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Ex PM Manmohan Singh
Dr. Manmohan Singh Death: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग कुठे राहात होते? या बंगल्याची खासियत काय?
अमरावती : शेअर बाजारात नफ्याचे आमिष; तब्बल २१.९२ लाखांची…

आदिती दत्तात्रय कुलकर्णी ( वय ७, रा. मल्हारीनगर, आंबेगाव, कात्रज) असे मृत्युमुखी पडलेल्या बालिकेचे नाव आहे. आदिती पाहिलीत शिकत होती. एकुलती एक मुलगी असलेली आदिती घराच्या खिडकीला बांधलेल्या झोका खेळत होती. तिची आजी घरात होती. आई आणि वडील दोघेही कामावर गेले होते. टॉवेल आणि दोरीने तिने झोका बांधला होता.

हेही वाचा… पुणे: मध्य रेल्वेकडून ‘पंढरपूर आषाढी एकादशी’ विशेष गाड्या

झोक्यावरून तिचा अचानक तोल गेला आणि त्याचा फास तिला बसला. तिच्या आजीने मदतीसाठी आरडाओरडा केल्यानंतर रहिवाशांनी तेथे धाव घेतली. त्यांनी फास सोडवला. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.

Story img Loader