पुणे : शहरात अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना वाढीस लागल्या आहेत. वानवडी भागातील शाळकरी मुलींशी व्हॅनचालकाने अश्लील कृत्य केल्याची घटना ताजी असतानाच खराडी भागातील एका शाळेत इयत्ता तिसरीतील मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा >>> ठेकेदाराच्या त्रासामुळे कामगाराची चाकूने गळा चिरून आत्महत्या, आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ठेकेदार अटकेत
खराडी भागातील एका शाळेत पीडित मुलगी तिसरीत आहे. १ ऑक्टोबर रोजी मुलीची आई तिला घरात चांगल्या आणि वाईट स्पर्शाबाबत (गुड टच आणि बॅड टच) माहिती देत होती. त्यावेळी मुलीने शाळेतील संजय सर नावाच्या एका व्यक्तीने प्रसाधनगृहाच्या बाहेर वाईट पद्धतीने स्पर्श केल्याचे मुलीने आईला सांगितले. केल्याचे आईला सांगितले.
हेही वाचा >>> शाळकरी मुलींशी अश्लील कृत्य प्रकरणात जप्त केलेली गाडी फोडली, वंचितच्या पदाधिकाऱ्यांसह नऊ जणांवर गुन्हा
त्यानंतर आई ३ ऑक्टोबर रोजी शाळेत गेली. तिने मुख्याध्यापिकेला याबाबत विचारले. त्यांनी देखील घटनेचे गांभीर्य ओळखून त्वरीत पोलिसांच्या दामिनी पथकाला याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी त्वरीत गुन्हा दाखल करून घेत आरोपीचा शोध सुरू केला आहे. मुलीला शाळेतील शिक्षकांची छायाचित्रे दाखविण्यात आली. मात्र, अश्लील कृत्य करणारी व्यक्ती दुसरी असल्याचे तिने सांगितले. पोलिसांनी शाळेतीली सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले आहे. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत.
चंदननगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. पोलिसांनी शाळेच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले आहे. – हिंमत जाधव, पोलीस उपायुक्त, परिमंडळ चार