पोलिसांकडून दोघे अटकेत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : दुचाकीस्वार युवतीला अडवून भररस्त्यात तिच्याबरोबर अश्लील वर्तन करून तिला मारहाण करण्यात आल्याची घटना बाणेर भागात घडली. या प्रकरणी चतु:शंृगी पोलिसांकडून दोघांना अटक करण्यात आली.

या प्रकरणी अविनाश राजेंद्र धनकुडे (वय २१,रा. बाणेर)आणि शेखर चांगदेव कळमकर (वय २२) यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत युवतीने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार युवती एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षिका आहे.  शनिवारी रात्री युवती मित्रांबरोबर बाणेर भागातील एका हॉटेलमध्ये गेली होती. मध्यरात्री अडीचच्या सुमारास दुचाकीस्वार युवती बाणेर भागातून जात होती.

त्यावेळी बाणेर येथील दूरध्वनी केंद्राजवळ दुचाकीस्वार युवतीला दुचाकीवरून आलेले आरोपी धनकुडे आणि कळमकर यांनी अडवले. दोघांनी तिच्याबरोबर अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर युवतीने घाबरून दुचाकी वेगाने पुढे नेली. धनकुडे आणि कळमकर यांनी तिला धक्काबुक्की केली.  या घटनेमुळे घाबरलेल्या युवतीने या घटनेची माहिती तिच्या मित्राला दिली. त्यानंतर दुचाकीवरील आरोपी पुन्हा तेथे आले. युवतीचे केस पकडून तिचे डोके आपटले.

दरम्यान, युवतीचा मित्र तेथे आला. तोपर्यंत आरोपी धनकुडे आणि कळमकर तेथून पसार झाले. घाबरलेल्या युवतीला मित्राने धीर दिला आणि या घटनेची माहिती चतु:शंृगी पोलिसांना दिली. पसार झालेल्या आरोपींना पोलिसांनी पकडले.