पुणे : लोहगाव विमानतळ परिसरात तरुणीचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून लष्करी जवानाला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी गणेश अशोक साळुंखे (वय ३२, रा. आंबावडे, ता. कोरेगाव, जि. सातारा) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत एका तरुणीने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तक्रारदार तरुणी लोहगाव विमानतळ परिसरात ॲप आधारित प्रवासी वाहतूक करणाऱ्या मोटारीची वाट पाहत थांबली होती. त्या वेळी आरोपी साळुंखे तेथे आला. त्याने तरुणीकडे संपर्क साधण्यासाठी मोबाइल संच मागितला. मोबाइल संच मागण्याच्या बहाण्याने साळुंखेने तरुणीशी अश्लील वर्तन केले.

Pune Municipal Corporation contract employee stabbed to death over immoral relationship in Kothrud
कोथरूडमध्ये अनैतिक संबंधातून तरूणाचा खून, पोलिसांकडून संशयित आरोपी ताब्यात
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Chhota Rajan gang. session court. Pre-arrest bail ,
विकासकाकडून दहा कोटींची खंडणी मागण्याचे प्रकरण : छोटा राजन टोळीच्या दोघांना सत्र न्यायालयातून अटकपूर्व जामीन
Ajit Rajgond sentenced to six days in forest custody may have hunted ten tigers in 11 years
बहेलियांकडून दहा वाघांची शिकार ! ७० लाखांचा व्यवहार !
private school bus in Umarkhed accident near Palshi Fata on Saturday killing ninth grade student
भरधाव वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू, चार जखमी; वाई बसस्थानकासमोर अपघात
Toddler killed by water tanker in pune
टँकरच्या चाकाखाली सापडून एक वर्षांच्या बालकाचा मृत्यू
accused akshay shinde encounter
अन्वयार्थ : हत्येचा गुन्हा दाखल कराच
Kerala woman sentenced to death for poisoning her boyfriend
प्रियकराला विष दिल्याप्रकरणी २४ वर्षीय तरुणीला फाशीची शिक्षा; कोण आहे ग्रीष्मा एसएस? नेमके प्रकरण काय?

हेही वाचा – पुणे महापालिकेत एकहाती सत्तेचे भाजपचे स्वप्न धूसर

तरुणीने आरडाओरडा केला. साळुंखेला विमानतळ परिसरात बंदोबस्तास असलेल्या जवानांनी ताब्यात घेतले. विनयभंग केल्याच्या आरोपावरून साळुंखेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक वाकडे तपास करत आहेत. साळुंखे हा सीमा सुरक्षा दलात (बाॅर्डर सिक्युरिटी फोर्स) नियुक्तीस असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Story img Loader