पुणे : विवाह नोंदणी संकेतस्थळावरुन झालेल्या ओळखीतून तरुणीचा विनयभंग केल्या प्रकरणी एकाच्या विरोधात चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तेजस आबनावे (रा. भोसलेनगर, हडपसर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका तरुणीने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी तरुणी आणि आरोपी तेजस यांची एका विवाह नोदणी संकेतस्थळावरुन ओळख झाली होती.
विवाहविषयक मत तसेच तरुणीचा परिचय करुन घेण्यासाठी तेजसने तिला सेनापती बापट रस्त्यावर बोलावून घेतले. तरुणी तेजसच्या मोटारीत बसली. तेव्हा त्याने लज्जास्पद वर्तन केले. तिचा विनयभंग केला. त्यानंतर त्याने मोबाइलवर संपर्क साधून शिवीगाळ केल्याचे तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक गाडेकर तपास करत आहेत.