पिंपरी : मनोरुग्ण तरुणीशी जवळीक साधून, मानसिक आजाराचा फायदा घेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना मे २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत निगडी, पुणे, येलवाडी या परिसरात घडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या प्रकरणी तरुणीच्या आईने निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार माणिक नानाभाऊ होरे (वय ३५) याला अटक केली आहे. त्याला मदत करणाऱ्या त्याच्या पत्नी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा >>>ऐन दिवाळीत रेल्वे प्रवासी वाऱ्यावर? पुणे स्थानक रोज दोन ते चार तास बंद राहण्याची शक्यता

फिर्यादी यांच्या मुलीचा विश्वास संपादन करून, ती मनोरुग्ण असल्याचे माहिती असूनदेखील आरोपी माणिक याने तिच्याशी जवळीक साधली. गोड बोलून, मानसिक आजाराचा फायदा घेऊन जबरदस्तीने बलात्कार केला. फिर्यादी व त्यांच्या पतीने याबाबत आरोपीला फोन करून जाब विचारला. तू आमचा विश्वासघात केला आहे, असे म्हटले असता. आरोपीने त्यांना शिवीगाळ करत त्यांचा मुलगा आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपीला त्याच्या पत्नीने साथ दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. निगडी पोलीस तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girl raped by taking advantage of mental illness in pimpri pune print news ggy 03 amy