सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सोमवारी एका विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केली. या मुलीचे नाव रेश्मा गायकवाड असून ती शिरूर तालुक्यात राहणारी होती. विद्यापीठाच्या वसतीगृह क्रमांक ३ मधील खोलीत तिने आत्महत्या केली. सूत्रांच्या माहितीनुसार, रेश्मा गायकवाड बॉटनीच्या (वनस्पती शास्त्र) द्वितीय वर्षात शिकत होती. तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत अद्याप माहिती समजू शकली नाही.
सविस्तर वृत्त लवकरच…
आणखी वाचा