पिंपरी चिंचवडच्या रुपीनगरमध्ये बारावीची परीक्षा दिलेल्या एका विद्यार्थिनीने शुक्रवारी आत्महत्या केली. शिल्पा कांबळे असं या मुलीचं नाव आहे. सायंकाळी साडे सहाच्या सुमारास ही घटना घडली. निगडी पोलीस पुढील तपास करत आहेत. शिल्पाचे कुटुंबीय गवंडीच्या हाताखाली काम करतात. आज सकाळी ते कामासाठी घराबाहेर होते.

तेव्हा शिल्पाने सायंकाळी राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. शेजारच्यांनी पोलिसांना आत्महत्येची माहिती दिली. शिल्पाने विज्ञान शाखेचे बारावीचे पेपर नुकतेच दिले होते. शिल्पाने आत्महत्येचे टोकाचे पाऊल का उचलले ते अद्याप अस्पष्ट असून, निगडी पोलीस तपास करत आहेत.

Story img Loader