पुणे : थॅलेसेमिया मेजर हा जीवघेणा रक्तविकार असलेल्या १० वर्षांच्या मुलीला तिच्या चिमुकल्या बहिणीने जीवदान दिले आहे. मुलीच्या अवघ्या २१ महिन्यांच्या बहिणीच्या मूळ पेशींचे प्रत्यारोपण करून डॉक्टरांनी तिच्यावर उपचार केले आहेत. ही सर्वांत कमी वयाची मूळ पेशीदाता ठरल्याचा दावा उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी केला आहे.

हेही वाचा >>> पुण्यात घरांच्या किमती वाढता वाढता वाढे…! सर्वाधिक वाढ कोणत्या भागात जाणून घ्या…

Babasaheb Ambedkar , RSS , RSS Karad branch,
संघाविषयी आंबेडकरांच्या ‘आपुलकी’चे सर्व दावे संशयास्पद! 
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Pandit Vishnu Rajoria on 4 Children
Video: ‘चार मुलांना जन्म द्या, एक लाख रुपये मिळवा’, ब्राह्मण जोडप्यांसाठी परशुराम मंडळाच्या अध्यक्षांची ऑफर
Baby overcomes respiratory problems after 72 hours of continuous treatment
बाळ जन्मतः रडत नाही? सलग ७२ तास अनोखे उपचार आणि ट्याहां ट्याहां सुरू…
Farhan Akhtar Shibani Dandekar pregnancy
फरहान अख्तर ५१ व्या वर्षी तिसऱ्यांदा बाबा होणार? मराठमोळी सून गरोदर असल्याच्या चर्चांवर सावत्र सासूबाई शबाना आझमी म्हणाल्या…
mentally challenged woman , mother,
आकलन क्षमता कमी असलेल्या महिलेला आई होण्याचा अधिकार नाही का ? उच्च न्यायालयाचा प्रश्न
Meet Indias first Gen Beta baby
हे आहे भारतातील ‘जनरेशन बीटा’चे पहिले बाळ! कोणत्या राज्यात झाला त्याचा जन्म? जाणून घ्या त्याचे नाव आणि ‘या’ पिढीची खास वैशिष्ट्ये
गर्भपाताची मागणी करणाऱ्या पालकांच्या भूमिकेचे आश्चर्य,उच्च न्यायालयाची टिप्पणी; मुलगी गतिमंद असल्याच्या दाव्यावरूनही ताशेरे

पश्चिम बंगालमधील रुपाली (नाव बदलले आहे) हिला थॅलेसेमिया मेजर या जीवघेण्या व सातत्याने रक्तसंक्रमण आवश्यक असणाऱ्या रक्तविकाराचे निदान झाले. वयाच्या पहिल्या वर्षापासूनच रुपालीला रक्तसंक्रमण व कीलेशन उपचार घेण्यासाठी लांब अंतराच्या प्रवासाचे आव्हान होते. यावर कायमस्वरूपी उपाय मिळावा या हेतूने तिला घेऊन पालक पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये आले. रक्तविकार व अस्थिमज्जा प्रत्यारोपणतज्ज्ञ डॉ. विजय रमणन यांच्या औषधोपचारांमुळे २०२१ पासून रुपालीला रक्त संक्रमणाची गरज भासली नाही. तिला संपूर्ण उपचार मिळावेत, अशी तिच्या पालकांची इच्छा होती. या कुटुंबाने दुसऱ्या बाळासाठी प्रयत्न केले. हे दुसरे बाळ जानेवारी २०२३ मध्ये जन्माला आले आणि हे बाळ म्हणजे रुपालीसाठी एक योग्य आनुवंशिक जुळणी ठरले.

हेही वाचा >>> मार्केट यार्डातील बँकेत सुरक्षारक्षकाला चाकूच्या धाकाने लुटण्याचा प्रयत्न, अल्पवयीनाविरुद्ध गुन्हा

प्रारंभिक मूल्यांकनादरम्यान रुपालीपेक्षा आठ वर्षांनी लहान असलेल्या मुलीचे वजन ४ किलोंपेक्षा कमी होते. दात्याचे वजन रुपालीच्या वजनाच्या किमान निम्म्यापर्यंत पोहोचण्याची प्रतीक्षा करण्याचे डॉक्टरांनी ठरवले. दात्याचे वजन विसाव्या महिन्यात १०.५ किलोपर्यंत पोहोचले. ही परिस्थिती मूळ पेशी काढण्यासाठी योग्य मानली जाते. अस्थिमज्जेच्या बाबतीत प्रक्रिया एकदाच केली जाऊ शकते; मात्र, मूळ पेशी काढण्याची प्रक्रिया पुन्हा केली जाऊ शकते आणि हा एक सुरक्षित पर्याय आहे. दात्यातून काढलेल्या मूळ पेशींचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा तिप्पट होते. नंतर या मूळ पेशींचे प्रत्यारोपण रुपालीमध्ये करण्यात आले. दाता आणि रुग्ण या दोघांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रक्रियेचे नियोजन केले.

प्रत्यारोपणासाठी रक्तातून मूळ पेशी गोळा करणे ही सर्वसाधारण भुलीची आवश्यकता नसलेली प्रक्रिया निवडण्यात आली. रुग्णासाठी योग्य प्रमाणात मूळ पेशी मिळविण्याच्या या प्रक्रियेत दात्याच्या सुरक्षिततेची खात्री करण्यावर आमचा भर होता. – डॉ. विजय रमणन, रक्तविकारतज्ज्ञ

Story img Loader