पुणे : पुण्यातील खडकी परिसरात राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर घरात घुसून गुंडाने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. यश धर्मेश कांबळे, वय २० असे आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा – अमित शाहांच्या भेटीबाबत अजित पवार म्हणाले, “जयंत पाटील हे…”
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी आणि आरोपी यश धर्मेश कांबळे हे दोघे एकच परिसरात राहण्यास आहे. १८ मार्च रोजी पीडित मुलगी घरात झोपली होती. त्यावेळी आरोपी यश धर्मेश कांबळे याने घरात घुसून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेबाबत घरातील कोणाला सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तेव्हापासून आरोपी हा अल्पवयीन मुलीला सतत त्रास देत होता. या त्रासाला कंटाळून पीडित मुलीने आमच्याकडे तक्रार देताच आरोपी यश धर्मेश कांबळे याला अटक करण्यात आली असून अधिक तपास सुरू असल्याचे खडकी पोलिसांनी सांगितले.