पुणे : मित्राला लग्नास नकार देणाऱ्या तरुणीवर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना पुण्याच्या मावळमध्ये घडली आहे. यात तरुणी गंभीर जखमी झाली असून मानेवर, हातावर आणि कानाच्या जवळ कोयत्याने वार करण्यात आले आहेत. या प्रकरणी सुनील उर्फ डुब्या रामदास ढोरे (वय २२) आणि अद्वैत उर्फ श्री भरत जाधव (वय २३) यांना कामशेत पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हल्ला करणारा मुख्य आरोपी सूर्यकांत उर्फ शाहीर पवार हा फरार आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत. आरोपींना न्यायालयात हजर केलं असता त्यांना चार नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

हेही वाचा… पुणे : मोटारींच्या काचा फोडून चोरीचे ४१ गुन्हे उघड ; हरियाणा, दिल्लीतील चोरटे गजाआड; १६ लॅपटाॅप जप्त

हेही वाचा… Maharashtra News Live : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुनील उर्फ डुब्या ढोरे ला पीडित तरुणीने लग्न करण्यास नकार दिला होता. याचा राग सुनीलचा मित्र सूर्यकांतला आला, त्याने अद्वैत आणि सुनील ला सोबत घेऊन तरुणीला जीवे मारण्याचा कट रचला. तरुणी पहाटेच्या सुमारास कामावर जात होती. दबा धरून बसलेल्या सूर्यकांतने तरुणीवर जीवे मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने हल्ला केला. दोघांमध्ये झटापट झाली, वार चुकवत असताना कोयता हातावर, मानेवर आणि कानाच्या बाजूला वार झाले. तरुणीने आरडाओरडा केल्याने तिन्ही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली असून शुद्धीवर येताच कामशेत पोलिसात तक्रार दिली आहे. मुख्य आरोपी सूर्यकांत हा अद्यापही फरार आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

Story img Loader