वारजे माळवाडी येथून दहा लाखांच्या खंडणीसाठी युवकाचे अपहरण केल्याच्या प्रकरणी या युवकाच्या मैत्रिणीला अटक करण्यात आली आहे. यापूर्वी या प्रकरणात दापोडीतील लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कॅप्टनसह दोघांना अटक करण्यात आली आहे.
सोनिका राजेंद्रसिंग वसीर (वय २३, रा. बावधन) असे या तरुणीचे नाव आहे. न्यायालयाने तिला १८ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या गुन्ह्य़ामध्ये यापूर्वी कॅप्टन विशाल बलबीरसिंग ठाकूर (रा. सीएमई, दापोडी) व कमलनयन सुंदरलाल शर्मा (वय २४, रा. एनडीए, खडकवासला) यांना अटक करण्यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोनिका ही अपहरण झालेल्या युवकाची व कॅप्टन विशाल याचीही मैत्रीण आहे. ९ मार्चला बावधन येथून सानिका व ठाकूर यांनी त्याचा साथीदार शर्मा याच्या मदतीने या युवकाचे अपहरण केले होते. दहा लाख रुपयांच्या खंडणीसाठी त्यांनी हा प्रकार केला होता. पोलिसांनी युवकाची सुटका करून दोघांना अटक केली.
युवकाच्या अपहरण प्रकरणी त्याच्याच मैत्रिणीला अटक
वारजे माळवाडी येथून दहा लाखांच्या खंडणीसाठी युवकाचे अपहरण केल्याच्या प्रकरणी या युवकाच्या मैत्रिणीला अटक करण्यात आली आहे.
First published on: 17-03-2014 at 03:22 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girlfriend arrested as she kidnapped her friend