वारजे माळवाडी येथून दहा लाखांच्या खंडणीसाठी युवकाचे अपहरण केल्याच्या प्रकरणी या युवकाच्या मैत्रिणीला अटक करण्यात आली आहे. यापूर्वी या प्रकरणात दापोडीतील लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कॅप्टनसह दोघांना अटक करण्यात आली आहे.
सोनिका राजेंद्रसिंग वसीर (वय २३, रा. बावधन) असे या तरुणीचे नाव आहे. न्यायालयाने तिला १८ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या गुन्ह्य़ामध्ये यापूर्वी कॅप्टन विशाल बलबीरसिंग ठाकूर (रा. सीएमई, दापोडी) व कमलनयन सुंदरलाल शर्मा (वय २४, रा. एनडीए, खडकवासला) यांना अटक करण्यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोनिका ही अपहरण झालेल्या युवकाची व कॅप्टन विशाल याचीही मैत्रीण आहे. ९ मार्चला बावधन येथून सानिका व ठाकूर यांनी त्याचा साथीदार शर्मा याच्या मदतीने या युवकाचे अपहरण केले होते. दहा लाख रुपयांच्या खंडणीसाठी त्यांनी हा प्रकार केला होता. पोलिसांनी युवकाची सुटका करून दोघांना अटक केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा