‘स्टरलाइट टेक्नोलॉजीज’ या कंपनीच्या ‘जीवनज्योती’ या ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’ प्रकल्पाद्वारे १५० मुलींना परिचर्या सेवेचे प्रशिक्षण देण्यात आले. नुकतीच या विद्यार्थिनींना एका कार्यक्रमात प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. या वेळी ऑस्ट्रेलियातील ‘इंजिनिअर्स विदाउट बॉर्डर्स’ (ईडब्ल्यूबी) या चमूने विद्यार्थिनींशी विकसनशील देशांच्या विविध समस्यांविषयी संवाद साधला. पुण्यातील भोर, आंबवणे आणि वेल्हे येथील ४० गावांतील महिलांना प्रकल्पात व्यावसायिक प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती संस्थेतर्फे देण्यात आली. जीवनज्योती इन्स्टिटय़ूटच्या शैक्षणिक भागीदार ज्योती अगरवाल, ‘स्टरलाइट’चे उपाध्यक्ष प्रवीण अगरवाल, ईडब्ल्यूबीचे समन्वयक जेनी टर्नर आदी या वेळी उपस्थित होते.
ग्रामीण भागातील मुली आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी व्हाव्यात तसेच त्यांना चांगला रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. जीवनज्योती ही संस्था त्यासाठी काम करत असल्याचे सांगण्यात आले. या प्रशिक्षणात व्यावसायिक प्रशिक्षण तसेच कौशल्य वृद्धी यावर भर देण्यात आला होता. संस्थेतर्फे अनेक रोजगाराभिमुख अभ्यासक्रम चालवले जातात. त्यात मुख्यत: परिचर्या, फॅशन डिझायनिंग, संगणक आदींचे प्रशिक्षण दिले जाते. त्या बरोबरच कापडी पिशव्या तयार करणे, कागदी पिशव्या तयार करणे, लिफाफे तयार करणे आदींचेही प्रशिक्षण वर्ग आयोजित केले जात असल्याचे सांगण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा