संगणकीय प्रणालीतून अत्याधुनिक तंत्रज्ञानाची सेवा देण्याच्या दृष्टीने ‘महावितरण’कडून सर्व वीजग्राहक व विद्युत यंत्रणांच्या जिऑग्राफीकल इन्फरर्मेशन सिस्टीमनुसार (जीआयएस) सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे. गणेशखिंड मंडलातील शिवाजीनगर, कोथरूड, िपपरी व भोसरी विभागात हे काम सुरू करण्यात आले आहे.
पुनर्रचित गतिमान विद्युत विकास व सुधारणा या कार्यक्रमांतर्गत सर्व वीजग्राहकांचे व विद्युत प्रणालीतील सर्व यंत्रणेचे सॅटेलाईट इमेजमध्ये भौगोलिक स्थानाचे निश्चितीकरण होणार आहे. त्यादृष्टीने संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून अत्याधुनिक सेवा देण्यासाठी जीआयएस सर्वेक्षण महत्त्वाचे आहे.
शिवाजीनगर, कोथरूड, िपपरी व भोसरी या चारही विभागांमधील सर्व वर्गवारीतील लघु व उच्चदाबाच्या सुमारे आठ लाख ५० हजार ग्राहकांचे व विद्युत यंत्रणेचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. एडीसीसी इन्फाकॅड ही कंपनी ‘महावितरण’च्या वतीने जीआयएस सर्वेक्षण करीत आहे. प्रत्यक्ष ग्राहकांच्या घरी जाऊन माहिती घेण्यात येत आहे. त्यासाठी ग्राहकांनी संबंधित कंपनीच्या प्रतिनिधींना सहकार्य करावे, असे आवाहन ‘महावितरण’च्या वतीने करण्यात आले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा