पुणे : गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेत सुरू असलेल्या प्रकरणात नवेच वळण आले आहे. संस्थेचे कुलगुरू डॉ. अजित रानडे यांची नियुक्ती रद्द करणारे नवनियुक्त कुलपती डॉ. बिबेक देबराय यांनीच पदाचा राजीनामा दिल्याचे समोर आले आहे.

डॉ. देबराय यांची गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेच्या कुलपतीपदी ५ जुलै रोजी नियुक्ती करण्यात आली होती. गोखले संस्थेच्या कुलगुरू पदासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) निश्चित केलेल्या निकषांची डॉ. अजित रानडे पूर्तता करत नसल्याच्या तक्रारीबाबत डॉ. देबराय यांनी सत्यशोधन समिती नियुक्त करून समितीच्या अहवालानुसार त्यांनी डॉ. रानडे यांना कुलगुरू पदावरून हटवण्याचा निर्णय घेतला. त्यावरून देशभरातील शिक्षण, संशोधन क्षेत्रात खळबळ उडाली. डॉ. देबराय यांच्या या निर्णयावर टीकेची झोड उठली होती. त्यानंतर डॉ. रानडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून डॉ. देबराय यांच्या निर्णयाला आव्हान दिले. त्यावरील सुनावणीत न्यायालयाने ७ ऑक्टोबरपर्यंत डॉ. देबराय यांच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे.

After the death of Dr Subhash Chaudhary his family has no maintenance fund and other financial benefits Nagpur news
दिवंगत कुलगुरूंच्या कुटुंबावर आर्थिक संकट, निधनाच्या तीन महिन्यानंतरही …
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Maharashtra Legislative Council Chairman post,
विधान परिषदेचे सभापतीपद कोणाकडे ?
degree work experience
अनौपचारिक कौशल्ये, कामाच्या अनुभवाधारे कोणालाही पदवी
Sonu Nigam
सोनू निगम कार्यक्रम सोडून गेलेल्या नेत्यांवर नाराज; म्हणाला, “हा सरस्वतीचा अपमान…”
S M krushna
महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस. एम. कृष्णा यांचे निधन, वयाच्या ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
Revenue Secretary Sanjay Malhotra to be the new RBI Governor for a period of 3 years!
RBI Governer : संजय मल्होत्रा आरबीआयचे नवे गव्हर्नर, पुढील तीन वर्षे असेल कार्यकाळ
suraj chavan meet dcm ajit pawar
“देवमाणूस आहेत दादा…”, अजित पवार उपमुख्यमंत्री होताच सूरज चव्हाण पोहोचला मंत्रालयात! नव्या घराबद्दल म्हणाला…

हे ही वाचा…वैज्ञानिक संशोधन आता अधिक वेगवान… संशोधन संस्थांमध्ये स्वदेशी बनावटीचे महासंगणक

या पार्श्वभूमीवर आता या वादाच्या स्थितीमध्ये नवे वळण आले आहे. आता डॉ. देबराय यांनीच कुलपती पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. या बाबत गोखले संस्थेकडूनही दुजोरा देण्यात आला आहे. मात्र डॉ. देबराय यांनी राजीनामा देण्याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

Story img Loader