पुणे : सोने आणि चांदीच्या भावातील तेजीचे वारे मंगळवारी कायम राहिले. यामुळे सोने आणि चांदीच्या भावाने सार्वकालिक उच्चांकी पातळी गाठली. दिल्लीतील सराफी बाजारपेठेत सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅमला ३५० रुपयांनी वधारून ८१ हजार रुपयांवर गेला. याचवेळी चांदीच्या भावात प्रति किलोला १ हजार ५०० रुपयांची वाढ होऊन भावाने १ लाख रुपयांची पातळी ओलांडली.

सणासुदीच्या काळामुळे ग्राहकांकडून सोन्याची खरेदी वाढल्याने भावात तेजी दिसून येत आहे. याचवेळी औद्योगिक मागणी वाढल्याने चांदीचे भाव वाढले आहेत. दागिने आणि भांड्यांसाठीही चांदीला मागणी वाढल्याचा परिणामही दिसून येत आहे. चांदीच्या भावात सलग पाचव्या सत्रांत वाढ नोंदविण्यात आली आहे. चांदीचा भाव प्रति किलोला १ हजार ५०० रुपयांनी वाढून १ लाख १ हजार रुपयांवर पोहोचला, अशी माहिती हिंदुस्तान झिंक लिमिटेडचे मुख्याधिकारी अरूण मिश्रा यांनी दिली.

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
gold price decreased one day before Dhantrayodashi
धनत्रयोदशीच्या एक दिवसापूर्वी सोन्याचे दर घसरले… हे आहेत आजचे दर…
Gold and silver prices fell, Lakshmi Pujan, Gold price,
लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्याच दिवशी सोने-चांदीचे दर घसरले; असे आहेत आजचे दर
Do you know how to make Chakali in the market
बाजारातील तयार चकल्या कशा बनवतात माहीत आहे का? पाहा VIRAL VIDEO तून ‘हा’ जुगाड
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Traffic jam in pune city due rush for Diwali 2024 shopping Shocking video
पुणेकरांनो दिवाळीच्या खरेदीला मंडईत जाताय? ‘हा’ VIDEO पाहून घरातून बाहेर येण्याआधी शंभर वेळा विचार कराल
Changes in gold price on Dhantrayodashi day nagpur
धनत्रयोदशीच्या दुसऱ्याच दिवशी सोन्याच्या दरात मोठे बदल; उच्चांकी दरामुळे..

हेही वाचा…पुणे वर्तुळाकार रस्त्यालगतच्या ११७ गावांचा विकास आता ‘एमएसआरडीसी’कडे, ६६८ चौरस किमी क्षेत्रफळासाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती

वस्तू वायदा बाजार मंच एमसीएक्सवर मंगळवारी सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅमला २०८ रुपयांनी वधारून ७८ हजार २४७ रुपयांवर गेला. याचवेळी चांदीचा भाव प्रति किलोला ८८२ रुपयांची उसळी घेऊन ९८ हजार ३३० रुपयांवर पोहोचला. जागतिक धातू वायदा बाजार मंच कॉमेक्सवर सोन्याचा भाव प्रतिऔंस २ हजार ७४७ डॉलरवर गेला तर चांदीच्या भावाने ३४.४१ डॉलरची उच्चांकी पातळी गाठली.

भावात लगेचच घट नाही

पु. ना. गाडगीळ आणि सन्सचे मुख्याधिकारी अमित मोडक म्हणाले की, गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये इस्राईलवर हमासने हल्ला केला तेव्हापासून सोने आणि चांदीच्या भावात वाढ सुरू आहे. आता हे युद्ध आणखी भडकले असून, त्यात इतर देशांचा प्रवेश झाला आहे. हे युद्ध संपेपर्यंत सोने, चांदीच्या भावात घट होणे शक्य नाही. याचबरोबर अमेरिकेची अर्थव्यवस्था कमकुवत झाली असून, व्याजदर कमी केल्याशिवाय उद्योग चालणार नाहीत आणि महागाई कमी होणार नाही, असा अंदाज व्यक्त होत आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याज दर कपातीचे चक्र आता सुरू केले आहे. व्याजदर कमी झाल्यानंतर सोने, चांदीचे भाव आणखी वाढतात. याचबरोबर युरोप आणि अमेरिकेत मंदीचे सावट आहे. त्यामुळेही सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून सोन्याला पसंती मिळत आहे. यामुळे भविष्यात सोन्याचे भावातील वाढ कायम राहील.

हेही वाचा…SSC : दहावीची परीक्षा आता आणखी सोपी! गणित, विज्ञानात ३५ पेक्षा कमी गुण मिळूनही अकरावीला प्रवेश जाणून घ्या नवे बदल काय?

सध्या इलेक्ट्रिक वाहने आणि सौर पॅनेलला मागणी वाढली आहे. सौर पॅनेलमध्ये चांदीचा वापर केला जातो. तसेच, इलेक्ट्रिक वाहनांच्या सुट्या भागांमध्येही चांदीचा वापर होतो. या वाहनांची विक्री वाढल्याने चांदीचा वापर वाढला आहे. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून चांदीचा भाव वाढत आहे.- अमित मोडक, मुख्याधिकारी, पु. ना. गाडगीळ आणि सन्स

चांदीच्या भावात मोठी तेजी दिसून येत आहे. सराफी बाजारपेठेत चांदीच्या भावाने एक लाख रुपयांचा टप्पा पार केला आहे. सध्याची चांदीच्या भावातील वाढ पाहता दिवाळीआधी हा भाव १ लाख १० हजार रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. – जतीन त्रिवेदी, उपाध्यक्ष, एलकेपी सिक्युरिटीज

Story img Loader