स्थानिक संस्था कराविरोधात बेमुदत बंद पुकारलेल्या पुण्यातील व्यापारी संघटनांनी सोमवारी अक्षयतृतीयेच्या दिवशीही आपला बंद सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला. पुण्यातील सराफी दुकानेही अक्षयतृतीयेला बंद राहणार आहेत.
अक्षयतृतीयेनिमित्त सोनेखरेदीसाठी अनेक ग्राहक सराफी दुकानांमध्ये जातात. त्यामुळे त्यादिवसासाठी बंद स्थगित करण्याचा विचार सुरू झाला होता. मात्र, पुणे सराफ असोसिएशनने बेमुदत बंद अक्षयतृतीयेच्या दिवशी सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला. जे सराफ दुकान उघडतील, त्यांच्याकडून २० हजार रुपये दंडही आकारण्यात येईल, असा निर्णय असोसिएशनने घेतला आहे.
एलबीटीचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकारला सदबुद्धी मिळावी, यासाठी शहरातील सर्व व्यापारी संघटना त्यांच्या परिसरात सोमवारी सत्यनारायणाची पूजा करणार आहेत. मंगळवारी बाजीराव रस्त्यावरील महाराणा प्रताप उद्यान ते लक्ष्मी रस्ता या मार्गावर पदयात्रा काढण्यात येणार आहे.

Story img Loader