दुबईहून सोन्याची तस्करी करणाऱ्या प्रवाशाला पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाच्या (कस्टम) पथकानं पकडलं आहे. संबंधित प्रवाशाने तस्करी करून आणलेले सोन्याचे दागिने सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडून जप्त करण्यात आले आहेत. जप्त केलेले दागिने २६ लाख ४५ हजार रुपये किमतीचे असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. आरोपी प्रवाशानं तस्करी करून आणलेले दागिने घेण्यासाठी विमानतळ परिसरात आलेल्या अन्य एका आरोपीला देखील सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे.

संबंधित आरोपींविरोधात कस्टम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींची कसून चौकशी केली जात आहे. तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर दुबईहून आलेला एक प्रवासी उतरला होता. तो विमानतळाच्या आवारातून बाहेर पडत असताना कस्टमच्या पथकाला त्याच्यावर संशय आला. अधिकाऱ्यांनी त्याच्याकडील सामानाची तपासणी केली असता, त्याच्याकडे सोन्याच्या बांगड्या, साखळी सापडली. अधिकाऱ्यांनी आरोपी प्रवाशाकडून ५०० ग्रॅम सोन्याचं दागिने जप्त केले आहेत.

pune airport news in marathi
उड्डाणे पुष्कळ; पण ‘उडान’ दूरच
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Navi Mumbai International Airport latest news in marathi
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचे काम अंतिम टप्यात
Three arrested in mephedrone production case in Vita
विट्यातील मेफेड्रोन उत्पादन प्रकरणी तिघांना अटक
watermelon Raigad demand Dubai business export
रायगडच्या कलिंगडांना दुबईत मागणी
11869 flights landed at nagpur international airport in 2024
बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ उपराजधानीत १२ महिन्यात ११ हजार ८६९ विमाने उतरली
Police detained three Bangladeshis living illegally in Bhiwandi for 15 years
भिवंडीतून तीन बांगलादेशींना ताब्यात, बनावट आधारकार्डासह शिधापत्रिका, पॅनकार्ड जप्त
47 year old Tanzanian was arrested with 55 cocaine capsules worth 7 5 crore rupees at mumbai airport
साडेसात कोटींच्या कोकेनसह टान्झानियाच्या नागरिकाला अटक, कोट्यावधीचे परदेशी चलन व सोने जप्त

जप्त करण्यात आलेल्या सोन्याच्या दागिन्यांची किंमत २६ लाख ४५ हजार रुपये असल्याची माहिती कस्टमच्या पुणे कार्यालयातील अधिकारी धनंजय कदम यांनी दिली. दुबईहून आलेल्या प्रवाशाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता विमानतळाबाहेर एक जण तस्करी करुन आणलेल्या सोन्याचे दागिने घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानंतर सीमाशुल्क विभागाने पुणे विमानतळ परिसरातून एकाला ताब्यात घेण्यात आले. आरोपींची कसून चौकशी केली जात आहे.

Story img Loader