पुणे : स्वस्तिक, ॐ यांसारखी शुभचिन्हे आणि गजमुखाच्या नक्षींनी सजलेला सुवर्णपाळणा श्रीमंत दगडूशेठ गणपतीसाठी साकारण्यात आला आहे. भाविकांनी दिलेल्या देणग्यांतून निर्मिलेल्या या सुवर्णपाळण्यामध्येच माघी चतुर्थीला बुधवारी (२५ जानेवारी) गणेश जन्म सोहळा होणार आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये दुपारी बारा वाजता गणेशजन्म सोहळा होणार आहे. भक्तांनी दिलेल्या देणगीतून निर्मिती करण्यात आलेल्या सुवर्णपाळण्यामध्ये गणेशजन्म होईल. पाळण्यासाठी पाच फूट उंचीचा सागवानी लाकडाचा स्टँड तयार करण्यात आला असून त्यावर साडेआठ किलो चांदी वापरण्यात आली आहे. तसेच त्यावर सोनाचे पॉलिश करण्यात आले आहे.

हेही वाचा >>> २१ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये ‘धर्मवीर’, आणखी ‘या’ सात मराठी चित्रपटांचा समावेश

या स्टँडवर १६ इंच बाय २४ इंचाचा सोन्याचा पाळणा साकारण्यात आला असून त्यासाठी २ किलो २८० ग्रॅम सोन्याचा वापर करण्यात आला आहे. मंदिरामध्ये बुधवारी पहाटे चार वाजता उस्ताद उस्मान खाँ ह सतारवादनातून श्रीं चरणी स्वराभिषेक अर्पण करणार आहेत. मंदिरावर आकर्षक पुष्पआरास व विद्युतरोषणाई करण्यात येणार आहे. भाविकांसाठी पहाटे तीनपासून मंदिर दर्शनासाठी खुले राहणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी दिली.  

Story img Loader