भांडारकर प्राच्यविद्या संस्थेच्या १९ खंडांच्या प्रकल्पाला ५० वर्षे पूर्ण
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
प्राच्यविद्या क्षेत्रातील विद्वानांनी तब्बल चार तपांच्या अथक संशोधनातून सिद्ध केलेल्या आणि भारतात पाठचिकित्साशास्त्राची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या महाभारताची चिकित्सक आवृत्ती या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या १९ खंडांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची सुवर्णमहोत्सव पूर्ती होत आहे. महाभारताच्या चिकित्सक आवृत्तीचे संशोधन कार्य डोळय़ांसमोर ठेवूनच नंतरच्या काळात देशामध्ये अशा पद्धतीचे कार्य झाले आहे. महाभारताची ही चिकित्सक आवृत्ती लवकरच सीडी माध्यमामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार असून, भविष्यात इंटरनेट माध्यमाद्वारे ती जगभरातील अभ्यासकांसाठी खुली करण्यात येणार आहे.
भांडारकर संस्थेने तयार केलेल्या महाभारताच्या चिकित्सक आवृत्तीचे २२ सप्टेंबर १९६६ रोजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रकाशन झाले होते. या घटनेला गुरुवारी पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. संस्थेच्या या अभूतपूर्व संशोधन कार्याची राष्ट्रपतींनी मुक्तकंठाने प्रशंसा केली होती. या सोहळय़ास तत्कालीन राज्यपाल डॉ. पी. व्ही. चेरियन आणि मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्यासह भारतरत्न डॉ. पां. वा. काणे, महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार आणि ज्येष्ठ प्राच्यविद्या संशोधक डॉ. रा. ना. दांडेकर उपस्थित होते.
प्राच्यविद्या संशोधनासाठीच कार्यरत राहण्याच्या उद्देशातून डॉ. रा. गो. भांडारकर यांच्या ८१व्या वाढदिवसाचे औचित्य साधून ६ जुलै १९१७ रोजी भांडारकर संस्थेची स्थापना झाली. स्थापनेनंतर लगेचच संस्थेने महाभारताची चिकित्सक आवृत्ती करण्याचा निर्णय घेतला. औंध संस्थानचे भवानराव पंतप्रतिनिधी हे संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष होते. त्यांनी या प्रकल्पासाठी स्वत:च्या संग्रहातील काही चित्रे आणि एक लाख रुपयांची देणगी दिली होती. रा. गो. भांडाकर यांनी स्वहस्ताक्षरामध्ये श्लोक लिहून १९१८ मध्ये या संशोधन प्रकल्पाचा श्रीगणेशा केला होता. प्राच्यविद्या क्षेत्रातील देशभरामध्ये नावाजलेल्या विद्वानांनी आपल्या संशोधनाच्या माध्यमातून या प्रकल्पासाठी योगदान दिले. तब्बल ४८ वर्षांनी म्हणजेच १९६६ मध्ये या प्रकल्पाची पूर्ती झाली.
महाभारताची चिकित्सक आवृत्ती हे भारतीय पाठचिकित्साशास्त्रातील पायाभूत स्वरूपाचे संशोधन कार्य आहे. त्या दृष्टिकोनातून हा संशोधन प्रकल्प मोलाचा आहे, असे सांगून भांडारकर संस्थेचे मानद सचिव डॉ. श्रीकांत बहुलकर म्हणाले, परदेशामध्ये बायबलसह ग्रीक आणि लॅटिन ग्रंथांच्या चिकित्सक आवृत्तीचे काम करण्यात आले होते. मात्र, महाभारत या महाकाव्याची प्रकृती वेगळी असल्यामुळे व्ही. एस. सुकथनकर यांनी परदेशामध्ये वापरण्यात आलेली संशोधन पद्धती जशीच्या तशी वापरली नाही. भांडारकर संस्थेने या चिकित्सक आवृत्तीसाठी विकसित केलेल्या संशोधन पद्धतीचा आदर्श डोळय़ांसमोर ठेवून देशभरात हीच संशोधन पद्धती आचरणात आणली गेली. बडोदा येथील ओरिएन्टल इन्स्टिटय़ूटने रामायणाची, तर अहमदाबाद येथील बी. जे. इन्स्टिटय़ूट फॉर लर्निग अँड रीसर्च या संस्थेने भागवत पुराणाची चिकित्सक आवृत्ती सिद्ध केली आहे. या संशोधन प्रकल्पामध्ये सहभागी झालेले रघु वीर हे लाहोर येथे वास्तव्यास होते. त्यामुळे उद्योगपर्व हा खंड १९३६ मध्ये लाहोर येथून प्रकाशित झाला होता. नंतर तेथून हा खंड पुण्यात आल्यानंतर भांडारकर संस्थेने पुन्हा प्रकाशित केला होता. अनुशासनपर्व हा रा. ना. दांडेकर यांनी संपादित केलेला खंड हा या प्रकल्पामध्ये अखेरचा प्रकाशित झालेला खंड होता.
महाभारताच्या चिकित्सक आवृत्तीचे खंड आणि संपादक
आदिपर्व- व्ही. एस. सुकथनकर
सभापर्व- फ्रँकलिन एजर्टन
अरण्यकपर्व (दोन खंड)- व्ही. एस. सुकथनकर
विराटपर्व- रघु वीर
उद्योगपर्व- एस. के. डे
भीष्मपर्व- श्रीपाद कृष्ण बेलवलकर
द्रोणपर्व (दोन खंड)- एस. के. डे
कर्णपर्व- प. ल. वैद्य
शल्यपर्व- रा. ना. दांडेकर
सौप्तिकपर्व-स्त्रीपर्व- ह. दा. वेलणकर आणि वा. गो. परांजपे
शांतिपर्व (चार खंड)- श्रीपाद कृष्ण बेलवलकर
अनुशासनपर्व- रा. ना. दांडेकर
अश्वमेधिकपर्व- रा. ना. दांडेकर
आश्रमवासिकपर्व, मौसलपर्व, महाप्रासादिकपर्व, स्वर्गारोहण- श्रीपाद कृष्ण बेलवलकर