पुणे : जागतिक पातळीवर सरासरी आयुर्मानात दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. एका नव्या संशोधनानुसार १९९० ते २०२१ या कालावधीत जागतिक पातळीवर सरासरी आयुर्मान ६.२ वर्षांनी वाढले. याचवेळी भारतीयांचे सरासरी आयुर्मान ८ वर्षांनी वाढल्याचेही समोर आले आहे.

जागतिक आयुर्मानाबाबत अमेरिकेतील इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्यूएशन (आयएचएमई) या संस्थेतीत संशोधकांनी संशोधन केले आहे. हे संशोधन लॅन्सेट या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झाले आहे. या संशोधनानुसार अतिसार, श्वसनमार्ग संसर्ग, हृदयविकार यांच्यामुळे होणारे मृत्यू कमी झाल्याने आयुर्मान वाढण्यास मदत झाली आहे. मागील तीन दशकांत भारतीयांचे सरासरी आयुर्मान ८ वर्षांनी वाढले आहे. दक्षिण आशिया विभागात भूतानमध्ये आयुर्मानात सरासरी सर्वाधिक १३.६ टक्के वाढ झाली आहे. त्याखालोखाल बांगलादेश १३.३ वर्षे, नेपाळ १०.४ वर्षे आणि पाकिस्तान २.५ वर्षे अशी वाढ आहे.

I don’t believe in work-life balance Narayana Murthy stands firm on 70-hour workweek
“माझा वर्क-लाइफ बॅलन्सवर विश्वास नाही”; आठवड्यातील ७० तास काम करण्याच्या मतावर नारायण मूर्ती अजूनही ठाम
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
moody forecasts indian economy
मूडीजला ७.२ टक्के अर्थवेगाचा विश्वास
stomach cancer marathi news
पोटदुखीकडे करू नका दुर्लक्ष!
home voting nashik
नाशिक: गृह मतदानापासून हजारो ज्येष्ठ मतदार, अपंग वंचित; यंत्रणेच्या अनास्थेमुळे ८५ हजार पैकी केवळ २४४९ मतदारांना लाभ
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
delhi ganesh demise
दाक्षिणात्य अभिनेते दिल्ली गणेश यांचं वृद्धापकाळाने निधन, हवाई दलातील सेवेनंतर सिनेसृष्टीत केलं होतं पदार्पण; ‘अशी’ होती कारकीर्द

हेही वाचा – निवडणूक रोखे घोटाळा म्हणजे ‘मोदीगेट’; स्वतंत्र आयोगातर्फे चौकशीची मागणी

आग्नेय आशिया, पूर्व आशिया आणि ओशनिया या विभागांमध्ये सरासरी आयुर्मानात सर्वाधिक ८.३ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. गंभीर श्वसनविकार, हृदयविकार, श्वसनमार्ग संसर्ग आणि कर्करोगामुळे होणारे मृत्यू या विभागांमध्ये कमी झाले आहेत. त्यामुळे सरासरी आयुर्मान वाढले आहे. याबाबत संशोधक डॉ. लिएन आँग म्हणाले की, आमच्या संशोधनातून जागतिक पातळीवरील आरोग्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. अनेक देशांनी अतिसार आणि हृदयविकारामुळे होणारे मृत्यू कमी करण्यात उल्लेखनीय यश मिळविले आहे. याचवेळी करोनामुळे मृत्यू वाढल्यामुळे सरासरी आयुर्मानातील वाढ कमी झाली आहे.

सरासरी आयुर्मानातील वाढ (१९९०-२०२१)

भूतान – १३.६ वर्षे

बांगलादेश – १३.३ वर्षे

नेपाळ – १०.४ वर्षे

भारत – ८ वर्षे

पाकिस्तान – २.५ वर्षे

हेही वाचा – राज्यावर उष्माघाताचे संकट! जाणून घ्या सर्वाधिक धोका कुठे वाढला…


करोना संकटामुळे १.६ वर्षांची घट

जागतिक पातळीवर करोना संकटामुळे सरासरी आयुर्मानातील वाढ काही प्रमाणात रोखली गेली आहे. करोना संकटामुळे सरासरी आयुर्मानात १.६ वर्षांची घट झाली आहे. जागतिक पातळीवर मृत्युदरात १९९० ते २०१९ या कालावधीत ०.९ ते २.४ टक्के घट झाली होती. त्यानंतर करोना संकटाच्या काळात मृत्युदरात वाढ झाली. सर्वाधिक मृत्यू होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या रोगांमध्ये करोना दुसऱ्या स्थानी पोहोचला. यामुळे सरासरी आयुर्मानात त्यावेळी घट झाली.