पुणे: पुणे मेट्रोचे विस्तारित मार्ग सुरू झाल्यानंतर प्रवाशांची गर्दी वाढली आहे. परंतु, प्रवाशांनी स्थानकापासून घरापर्यंत पोहोचायचे कसे, असा प्रश्न उपस्थित झाला होता. अखेर मेट्रो स्थानकापासून प्रवाशांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी शेअर रिक्षाला प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (आरटीओ) बुधवारी मंजुरी दिली. याबाबतच्या दरपत्रकालाही प्राधिकरणाने मान्यता दिली आहे.

मेट्रो स्थानकापासून प्रवाशांना घरापर्यंत पोहोचण्यासाठी स्वस्तात पर्याय यामुळे उपलब्ध होणार आहे. शेअर रिक्षाचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) मांडला होता. काही दिवसांपूर्वी याबाबत आरटीओत रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली होती. त्यानंतर आरटीओतील अधिकारी, वाहतूक पोलीस, सर्व रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी, महामेट्रो, पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि प्रवासी संघटना यांच्या प्रतिनिधींनी संयुक्त सर्वेक्षण केले. त्यात प्रत्येक मेट्रो स्थानकापासूनच्या जवळच्या मार्गांचे सर्वेक्षण करून अंतरानुसार शेअर रिक्षा भाड्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्याला प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी दिली.

Sudhir Mehta expressed his opinion regarding Pune Airport Pune news
‘पुणे विमानतळाचा व्यावसायिकदृष्ट्या विस्तार महत्त्वाचा’,कोणी केली मागणी ?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Pune city needs better mental health facilities pune
लोकजागर: शून्य शहर!
Metro 2A , Metro 7, Metro speed , Metro ,
‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ सुसाट, ताशी ८० किमी वेगाने मेट्रो धावणार
Traffic changes in Yerwada area on the occasion of Army Day procession
सेना दिन संचलनानिमित्त येरवडा भागात वाहतूक बदल
bandra terminus pit line
वांद्रे टर्मिनस येथे तीन पिट लाईन्सचे काम प्रगतीपथावर
Heavy Vehicles Ban on Ghodbunder Road for metro work
घोडबंदर मार्गावर मेट्रोच्या कामासाठी अवजड वाहतूकीला बंदी; ठाणे वाहतूक पोलिसांनी काढली अधिसुचना
Pune Mumbai Expressway New Link Road to Cut from Pune to Mumbai
पागोटे ते चौक मार्गामुळे मुंबई पुणे अतिजलद प्रवास; २० ते २५ किलोमीटरचे अंतर कमी होण्यास मदत

आणखी वाचा- पुण्यावर फुली! लायसन्स स्मार्ट कार्ड छपाई फक्त मुंबई, नागपूर, औरंगाबादमध्येच

किमान भाडे ११ रुपयांपासून सुरू

मेट्रो स्थानकापासून शेअर रिक्षा सेवा सुरू झाल्यास एकाच रिक्षातून तीन प्रवासी भाडे विभागून प्रवास करू शकतात. त्यामुळे एकटा प्रवासी असल्यास त्याला पूर्ण भाडे द्यावे लागणार नाही. एकूण १८ मेट्रो स्थानकांवर शेअर रिक्षा सुरू होणार आहेत. प्रत्येक स्थानकावर प्रवाशांच्या संख्येनुसार २ ते ६ रिक्षांचे स्टँड असेल. शेअर रिक्षाने प्रवाशांसाठी अंतरानुसार ११ रुपयांपासून भाडे सुरू होईल आणि पुढील अंतरानुसार त्यात वाढ होईल. खटुआ समितीच्या शिफारशीनुसार हे भाडे निश्चित करण्यात आले आहे.

आणखी वाचा-…असा उभारला दहा महिन्यांत चांदणी चौक उड्डाणपूल

मेट्रो स्थानकापासून शेअर रिक्षा सेवा सुरू होणार असल्याने त्याचा फायदा प्रवाशांसोबत रिक्षाचालकांना होणार आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील १८ मेट्रो स्थानके आणि पुणे रेल्वे स्थानक येथून शेअर रिक्षा सुरू होतील. -संजीव भोर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

Story img Loader