पुणे: पुणे मेट्रोचे विस्तारित मार्ग सुरू झाल्यानंतर प्रवाशांची गर्दी वाढली आहे. मेट्रो स्थानकापासून प्रवाशांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी शेअर रिक्षाचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) मांडला आहे. याबाबत रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींसोबत आरटीओने बैठकही घेतली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेट्रो स्थानकापासून प्रवाशांना घरापर्यंत पोहोचण्यासाठी स्वस्तात पर्याय उपलब्ध करून देण्याचा विचार सुरू आहे. यासाठी शेअर रिक्षाचा प्रस्ताव आरटीओने मांडला आहे. याबाबत आरटीओ कार्यालयात रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीत काही संघटनांनी सहमती दर्शविली तर काही संघटनांनी विरोध केला. यावर आरटीओतील अधिकाऱ्यांनी प्रत्येक मेट्रो स्थानकापासूनच्या जवळच्या मार्गांचे सर्वेक्षण करण्यासाठी रिक्षा संघटनांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

आणखी वाचा-पुणे: विमानतळावर मानवी बाँम्ब; अफवा पसरविणाऱ्या ज्येष्ठ महिलेवर गुन्हा

मेट्रो स्थानकापासून शेअर रिक्षा सेवा सुरू झाल्यास एकाच रिक्षातून तीन प्रवासी भाडे विभागून प्रवास करू शकतात. त्यामुळे एकटा प्रवासी असल्यास त्याला पूर्ण भाडे द्यावे लागणार नाही. मेट्रो स्थानकांच्या परिसरातील मार्गांचे सर्वेक्षण करून ते निश्चित केले जाणार आहेत. त्यानंतर प्रादेशिक परिवहन प्राधिकरणासमोर मार्ग आणि त्यांच्या भाड्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.

मेट्रो स्थानकापासून शेअर रिक्षा सेवा सुरू झाल्यास त्याचा फायदा प्रवाशांसोबत रिक्षाचालकांना होईल. रिक्षा संघटनांनी या प्रस्तावाला होकार दिल्यानंतर महामेट्रो, वाहतूक पोलीस आणि महापालिका यांच्याशी चर्चा करून अंतिम प्रस्ताव तयार केला जाईल. तो मंजुरीसाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणासमोर ठेवण्यात येईल. -संजीव भोर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Good news for travellers shared rickshaw from metro station to home in pune pune print news stj 05 mrj
Show comments